💥जिंतूर येथे आदिवासी पाड्यात जाऊन आ.मेघना बोर्डीकर यांनी केला राष्ट्रपती निवडीचा जल्लोश....!


💥तालुक्यातील केहाळ,मांडवा ईटोली आदी गावात आदिवासी बांधवा समवेत राष्ट्रपती निवडीचा केला आनंद साजरा💥

जिंतूर प्रतीनिधी  /  बी.डी. रामपूरकर 

देशाच्या सर्वोच्च पदी  राष्ट्रपती निवड पहिल्या आदिवासी महीलेची निवड झाल्या बद्दल लोकशाही देशा साठी भूषण व अभिमानस्पद क्षण असल्याची प्रतिक्रिया आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली. 

 आ.मेघना बोर्डीकर यांनी विजयाची काल घोषणा होताच तालुक्यातील आदिवासी गावात जाऊन केहाळ,मांडवा ईटोली आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत आदिवासी बांधवा समवेत निवडीचा फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंद साजरा केला.या वेळी स 21 जुलै रोजी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना मुर्मु यांना 3 लाख 78 हजार मूल्य असलेली 540 मते पडली.व भरघोस अश्या फरकाने विजय झाला.असे सांगून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना 130 कोटी जनता असलेल्या देशाने या ऐतिहासिक विजयाने इतिहास रचला असे प्रतिपादन करून सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या कारकीर्दीत घटनात्मक मूल्याची जोपासना निश्चितच केली जाईल असा विश्वास ही आमदार बोर्डीकर यांनी व्यक्त केला. कारण श्रीमती द्रोपदी मुर्मु यांचे सेवाभावी जीवन त्यांचा संघर्ष देशाला दिशा देणारा आदर्श ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या भेटी दरम्यान लक्ष्मणराव बुधवंत माजी जि.प.अध्यक्ष सखाराम जवादे,केशव घुले, संदीप घुगे,सुनील घुगे,संजय घुले, राजेंद्र थिटे,भगवानराव जगताप,दत्ता माघाडे, नारायण कोकाटे,सुरेश शेळके,विश्वनाथ अंभुरे,आदींची उपस्थिती होती.

जिंतूर तालुक्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमानात असून द्रौपदी मुर्मु यांची निवडीची घोषणा होताच तालुक्यातील कान्हा,ब्राह्मणगाव,कुराडी सावरगाव, कोरवाडी,करंजी,अंबरवाडी,कवठा बदनापूर,हिवरखेडा,केहाळ,माणकेश्वर इटोली,मांडवा घेवंडा,डोंगरतळा, दाभा गडदगव्हाण, वाडी, भुसकवडी दगडवाडी,श्रीरामवाडी,आडगाव (बाजार) सोरजा, वरुड (नरसिंह) वडाळी, साखरतळा, मालेगाव, पिंपराळा, चिंचोली, भोसी,जोगवाडा व जिंतूर आदी ठिकाणी या निवडीचे आदिवासी बांधवा तर्फे ढोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत विजय साजरा केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या