💥गृहस्थाश्रमातली भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती - हभप.रोहिदास मस्के


🔹गंगाखेड येथे सावतामाळी पुण्यतिथी ऊत्साहात 🔹

गंगाखेड : ब्रह्मचर्य, वानप्रस्थाश्रम आणि गृहस्थाश्रम या तीन्हींत गृहस्थाश्रमात कलेली भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. याच भक्तीमार्गाने संत सावतामाळी यांनी देवत्व प्राप्त केले, असे प्रतिपादन प्रसिद्ध किर्तनकार, रामायणाचार्य रोहिदास मस्के महाराज बामणीकर यांनी केले. गंगाखेड येथील संत सावतामाळी मंदिरात आयोजीत पुण्यतिथी सोहळ्यात ह.भ.प. मस्के बोलत होते. संत सावतामाळी यांनी आपले कर्म सांभाळत भक्ती केली. ती भक्ती एवढी ऊच्च कोटीची होती, की स्वतः पंढरपूरचे पांडूरंग सावता भेटीस त्यांच्या आरण गावात आले. यावरून आपणही बोध घेतला पाहिजे. सन्याशी होवून जंगालात भटकण्यापेक्षा, तीर्थ-वाऱ्या करण्यापेक्षा आपलं कर्म करत देव भक्ती करावी, असे आवाहन त्यांनी ऊपस्थित श्रोत्यांना केले.  

दुपारच्या किर्तनानंतर संताजी महाराज मठ येथे अन्नदान महाप्रसाद  कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाजातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या