💥हिंगोली जिल्ह्यातील नऊ गावामधील शेतकरी यंदाही पिकविम्यापासून वंचित....!


💥तालुका कृषी अधिकाऱ्यांना या संदर्भात ग्रामस्थाच्या वतीने निवेदन💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

निजामकाळात पूर्वी जिथे वस्ती होती पण आता कुणी राहत नाही अशा काही ठिकाणी स्थळांच्या महसूल खात्याकडे आजही पूर्वीच्या नावाने उजाड ओसाड, बेचिराख गाव म्हणून नोंदी आहेत थोडक्यात आता प्रत्यक्षात त्या गाव नाही पण, त्या परिसराची आजही गाव म्हणून नोंदी आहे. अशा परिसरात शेती आसणाऱ्या शेतकऱ्यांना पिकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या कळमनुरी तालुक्यातील देवदरी, खरवी, रहिमापुर, धुमका,गणगाव, कृष्णापुर, धानोरा, चींचोर्टी, वसपांग्रा या नऊ गाव शिवारातील अनेक शेतऱ्यांना यंदाही याचा फटका बसला. ते आपल्या पिकांचा विमा काडू शकले नाहीत.


             कळमनुरी तालुक्यातील या नऊ गावांची 'ओसाड किंवा बेचारख गाव' म्हणून आणेक वर्षांपासून सरकारी दप्तरात नोंद आहे. या गावा शिवरमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. पण गतवर्षीणासून अतिवृष्ठिमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पाणी शेतात जाऊन पीक हातचे जात आहे. दरम्यान, आपल्या पिकांचा विमा काढण्यासाठी आनेक शेतकरी पीकविमा केंद्रावर गेल्यानंतर ऑनलाईन पीकविमा भरताना पोर्टलवर या नऊ गावांचे नाव येते, पण या गावाची उजाड गाव आशी नोंद. महसूल दप्तरी असल्याने ही नऊ नवे व्हेरिफाय होत नसल्याने शेतकऱ्यांचा विमा निघत नाही. त्यामुळे नऊ गाव शिवारातील शेतकऱ्यांना दोन वर्षापासून पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. ही तांत्रिक अडचणी दूर करावी, याचा शेतकरी पाठपुरावा करीत आहेत. पण त्या कडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे यंदाही शेतकऱ्याना पिकविम्यापसून वंचित राहावे लागत आहे.

*  नेमकी काय अडचन ?

      कळमनुरी तालुक्यातील नऊ गावांची 'बेचिराख गाव' म्हणून नोंदी आहे. या नऊ गाव शिवारामध्ये आनेकांची शेती आहे ऑनलाईन पीकविमा भरण्यासाठी या गावाचे नाव संबधित संकेतस्ळावर येत आहे. परंतु त्या ठिकाणी आता प्रत्यक्षात गावच नसल्याने 'होल्डिंग व्हेरिफा' होत नाही. परिणामी विमा काढता येत नाही.

* शेतकऱ्यांचे निवेदन :-

हिंगोली जिल्ह्यातील ही नऊ गावे शेती शिवर तातडीने पीकविमा पोर्टलला  जोडून या भागातील शेतऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मंगळवारी दि 19/07/2022 रोजी शेतकऱ्यानी तालुका कृषी अधिकारी गजनंद पवार यांच्याकडे निेदनाद्वारे केली. या वेळी डॉ. वसंतराव पतंगे, कैलास पतंगे, वैभव देशमुख, शंकर माने, ज्ञानेश्वर पतंगे, विकास पतंगे, गोपीनाथ पतंगे, राजू माने, भारत पतंगे, लक्ष्मण माने, मुकिंदा इंगोले, अविनाश पतंगे, सूरज पतंगे आणि बालाजी साखरे उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या