💥स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त स्वयंरोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद....!


💥या मेळाव्याद्वारे बेरोजगार युवक-युवतींसाठी उद्योग,व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले💥

परभणी (दि.15 जुलै) :  स्वातंत्र्या अमृत महोत्सव व जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, नारायण चाळ, परभणी येथे स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एक पाऊल स्वयंरोजगाराकडे या संकल्पनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराबाबत प्रोत्साहन व चालना देण्यासाठी तसेच आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी शासनाच्या विविध यंत्रणेचा सहभाग नोंदवून स्वयंरोजगारासाठी त्यांना मदतीचा हात देणे, बेरोजगारी दूर करण्याच्या उद्देशाने शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे हा या स्वयंरोगार मेळाव्याचा उद्देश होता. तसेच या मेळाव्याद्वारे बेरोजगार युवक-युवतींसाठी उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसचे शासनाच्या विविध महामंडळांच्या योजनांचा लाभ घेऊन बेरोजगारांनी स्वयंरोजगार सुरु करावा, असे आवाहन प्र. सो. खंदारे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, परभणी यांनी यावेळी केले. 

या मेळाव्यास विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी व युवक-युवती उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या