💥कै.वामनराव बोर्डीकर कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या साक्षी पारवे यांचा पुढाकार💥
सेलू (दि.03 जुलै) - तालुक्यातील रवळगाव येथे कै.वामनराव बोर्डीकर कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या साक्षी पारवे,ऐश्वर्या काळे,यांनी ग्रामीण कार्यानुभव या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील जनावरांचे लसीकरण केले.
या लसीकरण मोहिमेसाठी संग्राम रामाने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पशु वैद्यकीय अधिकारी डॉ कुणाल मोगल यांनी मार्गदर्शन करीत लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन दिले.या मोहिमेस कै.वामनराव बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.ए.चव्हाण,कार्यक्रम समन्वयक प्रा.ए.आर.वाटेकर,कार्यक्रमाधिकारी डॉ.एस.जी.इंगळे,पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागप्रमुख प्रा.एन.टी.साबळे आदींनी मार्गदर्शन केले.यावेळी कृषी कन्या असलेल्या साक्षी पारवे व ऐश्वर्या काळे यांनी पावसाळ्यात होणारे जनावरांचे आजार आणि त्यासाठी घ्यायची काळजी यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी रवळगाव येथील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेतले.....
0 टिप्पण्या