💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या हेडलाईन्स.....!


💥पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता,आज पुण्यासह १८ जिल्ह्यांना आयएमडी कडून इशारा💥                                     

✍️ मोहन चौकेकर  

* राज्यसभेत गोंधळ,तृणमुलच्या ७ जणासह १९ खासदारांचे एका आठवड्यांसाठी निलंबन : दिल्लीत राहुल गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

*संकट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल, जालन्यात जाऊन भुमिका स्पष्ट करणार, आता आमचं ठरलं,कडु विषय पुर्णपणे संपले, अर्जुन खोतकरांच्या भुमिकेवर रावसाहेब दानवेंचे स्पष्ट मत* 

* पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता,आज पुण्यासह १८ जिल्ह्यांना आयएमडी कडून इशारा : हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

* “जीवाभावाची शिवसेना सोडून गेलेले…,” जयंत पाटलांनी वर्तवलं भाकित ; म्हणाले “पावसाळा संपेपर्यंत थांबायला हवं होतं” “राज्याला अपंग करुन सोडलंय,” राष्ट्रवादीची शिंदे-फडणवीसांवर टीका

* “दीपक केसरकर हा भामटा आणि लबाड माणूस” शिवसेना नेत्याची बोचरी टीका : शिवसेनेचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यासह बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

* पुणे : मांजरीत शाळेच्या आवारात सापडला ‘ग्रेनेड बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तातडीने बॉम्ब निकामी केला

* आपत्तीत मदतीसाठी लेखापरीक्षक महिलेचा पुढाकार, यांत्रिक नौका चालवण्याचे कौशल्य आत्मसात चिपळूणमधील लेखापरीक्षक निशा आंबेकर-कुलकर्णी यांनी यांत्रिकी नौका चालवण्याबरोबरच पाण्यात बुडणाऱ्याला बाहेर काढून प्रथमोपचार करणे, ड्रोनचा वापर, सुरक्षाविषयक उपाय इत्यादीचे प्रशिक्षण घेतले.

* प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर ‘प्लास्टिक बंदी’ नियमांमध्ये सुधारणा प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

* राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, पुणे जिल्ह्याला पालकमंत्री द्या – राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

*कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत ओबीसींसाठी ३५ जागांचे आरक्षण : निवृत्त मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया आयोगाच्या अहवालाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेत नागरिकांचा मागास प्रवर्गाची आरक्षण टक्केवारी २७ टक्के ग्राह्य धरण्यात आली आहे.

* झोमॅटोच्या शेअरच्या दरानं अक्षरश: तळ गाठलाय ; एका वर्षाने सोमवारी झोमॅटोच्या शेअरच्या भावानं ५० रुपयांपेक्षाही खालची पातळी गाठली आहे

* ११ हजार कोटी रुपये खर्चूनही गंगा नदी प्रदुषित का ? वरुण गांधींचा सवाल गंगेत मृत्युमूखी पडलेल्या माशांचा व्हिडिओ ट्वीट करत वरुण गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

* धक्कादायक : १६ वर्षाच्या मुलीचं अपहरण तीन महिने सामूहिक बलात्कार; झारखंडमधली अमानुष घटना झारखंडमध्ये इयत्ता नववीच्या वर्गातील १६ वर्षीय मुलीवर तीन नराधमांनी सलग तीन महिने अत्याचार केला.

* सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला ते म्हणाले, जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या.

* उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले गेले ; संजय शिरसाट म्हणाले,आमची हयात शिवसेनेत गेली असून आम्ही पालापोचाळा नाही.

* शिवसेनेची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्विकारली आहे.येत्या 1 ऑगस्टला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 

* गुजरातच्या बोटाद शहरातमध्ये विषारी दारुमुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारनं एसआयटीची स्थापना केली आहे.

* ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम्स) खेळू शकणार नाही. त्याला जवळपास महिनाभर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या