💥पारोळा धबधबा ओसंडून वाहू लागला या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी हा धबधबा बनला सेल्फी पॉईन्ट....!


💥हिंगोली शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे हा धबधबा💥 

 शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

राज्यासह मराठवाड्यातील व विदर्भातील गेल्या सात दिवसा पासून मुसळधार पाऊस पडत त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे ग्रामस्थ सद्या पर्यटन ठिकाणी गर्दी करत आहेत 

हिंगोली शहरालगत असलेल्या पारोळा येथील धबधबा संततधार पावसाने ओसंडून वाहू लागला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी हिंगोली सह जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दी करत आहेत 

हिंगोली शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पारोळा येथील धबधबा पावसाच्या संतधारेने ओसंडून वाहू लागला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील आठ ते नऊ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील मुसळधार होत असलेल्या संततधार पावसाने शेती चे नुकसान झाले आहे. तसेच अनेक नदी-नाल्यांना पूर येऊन काही गावे पुराच्या पाण्याने वेढले गेले आहेत तर अनेक गावांचा संपर्क ही तुटलेला आहे. 

या संततधार पावसाने जिल्ह्यातील पर्यटन केंद्र म्हनून ओळख असलेले पारोळा येथील धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. याचा आनंद घेण्यासाठी हिंगोली शहरातील महाविद्यालयीन तरुण तरुणी पर्यटक तसेच दूरवरील पर्यटकही याठिकाणी दाखल होत आहेत. हा धबधबा दुथडी भरून वाहू लागला आहे हा  धबधबा आत्ता सेल्फी पॉईन्ट बनला आहे मात्र या ठिकाणी येणाऱ्या सर्व तरुणांनी आप आपली काळजी घेणे गरजेचे आहे गेल्या वर्षी यांच धबधब्यावर दोन तरुण वाहून गेले होते सध्या मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे कधि मोठ्या कधि पानी वाढेल यांचा काय नेम नाही त्यामुळे सर्वानी आप आपली काळजी घेणे गरजेचे आहे तसेंच प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी ग्रामस्थांना जाण्यासाठी बंदी करण्यात यावी जने करून काही दुर्घटना घडणार नाही ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या