💥पुर्णा तालुक्यातील गौर येथील आरो प्रणाली अपहार प्रकरणाचे पित्तळ उघडे पडताच आरो मशीन पोहोचल्या अंगणवाडीत....!


💥गावातील आरो प्रणालीसाठी शासनाने दिला लाखो रुपयांचा निधी ; तरीही अंगणवाडीतील विद्यार्थी/गावकरी फिल्टर पाण्यापासून वंचित💥 


 
(भाग क्र.०२) : गाव तस चांगल पण.....

✍🏻परखड सत्य :- चौधरी दिनेश -

पुर्णा (दि.३१ जुलै) - " अहो गाव तस लई चांगल पण भ्रष्ट ग्रामविकास अधिकारी अन् सरपंचांचे प्रतिनिधी सरपंच पती महोदयांनी अक्षरशः एशीला टांगल जनसामान्य गावकरी मंडळींच गावविकासाच स्वप्न मात्र भंगल अन् विरोधक मात्र स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी भ्रष्ट सरपंच/ग्रामसेवकांच्या रंगात रंगल " 


अशी एकंदर अवस्था पुर्णा तालुक्यातील गौर गावाची झाल्याचे दिसत असून गौर ग्रामपंचायत अंतर्गत गावातील एकंदर चार अंगणवाड्यांकरीता शासनाकडून आतापर्यंत अंगणवाडी संरक्षण भिंत बांधकाम,अंगणवाडी साहित्य खरेदीसह अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या बालकांना स्वच्छ व निर्जंतूक पाणी पिण्यास उपलब्ध व्हावे याकरिता आरओ प्रणाली वाटर फिल्टर साठी लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाल्या परंतु अगदी काल पर्वा पर्यत गावातील एकाही अंगणवाडीत आरो मशीन बसवण्यात आलेली नव्हती सदरील प्रकरण गावातील जागृत सुशिक्षित नागरिक मुंजाजी जोगदंड यांच्या निदर्शनास आल्यानंतर मात्र 'डुबता क्या नही करता' अशी अवस्था झालेल्या भ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी तात्काळ क्षणाचाही विलंब नकरता अंगणवाड्यांमध्ये आरो मशीन पोहोचवण्याचे काम केले खरे परंतु पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आल्यानंतर देखील पाणीपुरवठा योजनाच कार्यान्वित नसल्यामुळे शेवटी सदरील आरो मशीन अंगणवाडीत केवळ शोभेच्या वास्तू म्हणून ठेवण्यात आल्या अंगणवाड्यांतील साहित्य खरेदी तसेच संरक्षण भिंतींची काम देखील कागदोपत्रीच झाल्याचे निदर्शनास येत असून संबंधित गौर ग्रामपंचायत प्रशासनाचे ग्रामविकास अधिकारी सरपंच प्रतिनिधी तथा सरपंच पती महोदयांनी गावाच्या विकासाच्या नावावर असा एकही निधी सोडला नाही ज्या निधीत अपहार केला नसेल अहो गावातील जागृत ग्रामदैवत असलेल्या सोमेश्वर महादेव देवस्थानासह परिसरातील हेमाडपंथी बारवाच्या नावावर देखील ग्रामविकास अधिकारी व सरपंच पती महोदयांनी अनंत अपहार केल्याचे उघडकीस आले असतांना गावातील सरपंच समर्थक चांडाळ चौकडी मात्र जो तळ राखल तो पाणी तर पिणारच ना ? असे म्हणून अपहारावर सोईस्कररित्या पांघरूण जरी टाकण्याचा प्रयत्न करीत असले तरी शेवटी या तळराख्याने संपूर्ण तळच गिळल्यागत केल्याचे निदर्शनास येत असून गौर गावाचा विकास तर सोडाच हो या गावाची अवस्था बघितल्यास असे निदर्शनास येते की या गावात विकासच काय विकासाची सावली देखील पडलेली नाही........ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या