💥परभणी जिल्ह्यातील वारांगनांच्या मुलींना मिळाले कस्तुरबा महाविद्यालयात प्रवेश....!


💥वारांगनाच्या प्रवेशपात्र 10 मुलींना परभणी जिल्ह्यातील कस्तुरबा महाविद्यालयात मिळाला प्रवेश💥

परभणी (दि.16 जुलै) : जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय परभणी, शिक्षण विभाग परभणी आणि विविध सेवाभावी संस्था यांच्या मदतीने परभणी जिल्ह्यातील वारांगना आणि त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणून वारांगनाच्या प्रवेशपात्र 10 मुलींना परभणी जिल्ह्यातील कस्तुरबा महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.

 कस्तुरबा महाविद्यालयात या मुलींना महाविद्यालयीन स्तरापर्यंत निवासाची, भोजनाची व ईतर सर्व सोयी सुविधा निःशुल्क उपलब्ध करुन दिल्या जातात. त्यामुळे या मुलींना स्वतःच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित व पोषक असे वातावरण मिळणार आहे. यानंतर वारंगनांच्या मुलांनाही महिला व बाल विकास विभाग व समाजकल्याण विभागाच्या विविध वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या