💥परभणी तालुक्यातील पिंगळी येथे शेक हॅन्ड फाउंडेशन परभणी तर्फे जिल्हा परिषद शाळेतील निराधार विद्यार्थ्यांना मदतीचा हात....!

💥यावेळी एकूण 11 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट चे वाटप करण्यात आले💥

परभणी (दि.26 जुलै) - तालुक्यातील पिंगळी येथील केंद्रीय कन्या शाळेत काल दि.25 जुलै 2022 रोजी शेक हॅन्ड फाउंडेशन परभणी तर्फे एकेरी पालक असणार्‍या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले या प्रसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री देशपांडे सर , कन्या शाळा पिंगळी चे मुख्याध्यापक शिंदे सर, महिंद्रकर मॅडम, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री .बोरसे सर, प्रा शा पिंगळीच्या मुख्याध्यापिका प्रतापवार मॅडम श्री .कुरवाडे सर, गाडेकर सर, प्रा.शा उर्दूचे आसेफ सर , खमरुद्दीन सर आदींची उपस्थिती होती.* तसेच सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते.

 शैक्षणिक किट मध्ये प्रशाला चे दोन विद्यार्थी, प्रा शाळा पिंगळी चे 3 विद्यार्थी, प्रा शा उर्दूच्या 2 विद्यार्थी आणि कन्या पिंगळीच्या 3 विद्यार्थिनी, ताडलीमला येथील एक विद्यार्थी अशा एकूण 11 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट चे वाटप करण्यात आले.. विद्यार्थ्यांना  आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य या किटमध्ये आहे. शेकहॅण्ड फाउंडेशन तर्फे तीनशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट चे वाटप करण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या