💥अमृत महोत्सव फळबाग लागवड कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न...!


💥उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते श्री.तीळभांडेश्वर सिसोदेंच्या शेतात आंब्याची कलमे लावण्यात आली💥

गंगाखेड /प्रतिनिधी 

अमृत महोत्सवी फळबाग लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड तालुक्यात विविध गावांमध्ये फळबाग लागवड करण्यात आली त्यामध्ये आज  मोजे पोखर्णी वा. येथे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते श्री.तीळभांडेश्वर सिसोदे यांच्या शेतात आंब्याची कलमे लावून सुरुवात करण्यात आली असून एकूण ७६० झाडे लागवड होत आहे

      तसेच मोजे गोपा येथे तालुका कृषी अधिकारी गंगाखेड श्री. पी बी बनसावडे यांच्या हस्ते सौ लताबाई  शंभूदेव कदम यांच्या शेतावर दोन एकर क्षेत्रावर ३२० अंबा कलमाची  लागवड , सौ. सुनिता चुडाजी कदम यांच्या शेतावर दोन एकर क्षेत्रावर ३२० आंबा कलमे रोपांची लागवड व मौ वाघलगाव शिवारातील श्री कमलाकर श्रीपती शिंदे यांच्या ०.५० हे क्षेत्रावर ८३३ पेरू रोपांच्या  लागवडीस सुरुवात करण्यात आली असून दोन दिवसात संपूर्ण लागवड होईल.

मा.आ. डॉ रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या फळबाग लागवड संकल्पनेनुसार  चालू वर्षी अमृत महोत्सवी फळबाग लागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर तालुका कृषी कार्यालय गंगाखेड यांच्याकडून एकूण  ६०८शेतकरी यांचे कडून  ५१२हे  प्रस्ताव मागवण्यात आले असून दि २७ जुलै अखेर पर्यंत गंगाखेड तालुक्यात शेतकरी यांच्या शेतावर एकूण  ४७ हेक्टर क्षेत्रावर आंबा, लिंबू ,सीताफळ व पेरू फळपिकांची लागवड करण्यात आलेली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या