💥पुर्णा शहराला जोडणारा लोहमार्गाखालील एकमेव भुयारी मार्ग पावसाळ्यात ठरतोय समुद्रीमार्ग...!

 


💥या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या चारचाकी/दुचाकी स्वारांना प्रवास ठरतोय अत्यंत धोकादायक💥 

पुर्णा (दि.०५ जुलै) - दक्षिण मध्य रेल्वे विभागाचा बेजवाबदार कारभार जनसामान्यांसाठी सातत्याने त्रासदायक ठरत असून पुर्णा-नांदेड/पुर्णा-हिंगोली लोहमार्गावरील रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाचे बांधकाम मागील तिन वर्षापासून संथगतीने सुरू असल्यामुळे पुर्णा-नांदेड राज्यमार्गासह व पुर्णा-ताडकळस मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी हा मार्ग बंद करण्यात आल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील वाहन धारकांसह पादचाऱ्यांना रेल्वे भुयारी मार्गारून प्रवास करण्याशिवाय कुठलाही पर्याय नसल्याचे निदर्शनास येत असतांना दक्षिण मध्य रेल्वे विभागातील बेजवाबदार व भ्रष्ट कारभारामुळे सदरील भुयारी मार्गाचे काम अत्यंत चुकीच्या पध्दतीने झाल्यामुळे या भुयारी मार्गात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे सदरील मार्ग प्रवास्यांसाठी अक्षरशः समुद्री मार्ग ठरत आहे.


 पुर्णा शहराला जोडणाऱ्या या रेल्वे भुयारी मार्गावरून तालुक्यातील ग्रामीण भागातून शहरात प्रवेश करतांना मोठ्या प्रमाणात साचलेल्या पावसाच्या पाण्यातून दुचाकी व चार चाकी वाहन धारकांना अक्षरशः जिव मुठ्ठीत घेऊन या भुयारी मार्गावरून प्रवास करावा लागत असून जेंव्हा जेंव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस होतो त्यावेळी प्रवास्यांना तारेवरची कसरत करावी लागते याकडे दक्षिण मध्य रेल्वे विभागीय प्रशासनाला लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे  सबंधीत रेल्वे विभाग याकडे गांभिर्याने लक्ष देईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या