💥परभणीत माँसाहेब मीनाताई ठाकरे विधवा,परितक्त्या स्वावलंबन संकल्प योजनेचा शुभारंभ....!


💥परभणी विधानसभा मतदार संघातील निराधार महिलांचा आधार बनुन त्यांना स्वावलंबी करणार - आ.राहुल पाटील

माझ्या संकल्पनेतून परभणी विधानसभा मतदार संघातील विधवा, परितक्त्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी माँसाहेब मीनाताई ठाकरे स्वावलंबन संकल्प योजना सुरु करण्यात आली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायीक विज्ञान महाविद्यालयात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. संप्रिया पाटील, सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ.डी.एन गोखले, कुलसचिव धीरज कदम, मुख्याध्यापिका जया जाधव,  महिला आघाडी संघटक अंबिका डहाळे, प्राचार्या डॉ.जया बंगाळे, सदाशिव देशमुख, संजय गाडगे, नंदू अवचार, ज्ञानेश्वर पवार, संदीप झाडे, अरविंद देशमुख, दिनेश बोबडे, गजू देशमुख, सुभाष जोंधळे, सुशील कांबळे, नवनीत पाचपोर, गजानन काकडे, बाळू गोडबोले, नंदिनी पानपट्टे आदींची उपस्थिती होती.


आपण दुसऱ्यांची घरे पेटवण्याचे काम करत नसून गोरगरिबांच्या चुली पेटवण्याचे काम करत आहे म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारणाची शिकवण पुढे घेऊन जात आहे. परभणी विधानसभा मतदार संघातील निराधार महिलांचा आधार बनुन त्यांना स्वावलंबी करणार असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी केले.

समाजकारणातून राजकारणात जाता येते, समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. मागील आठ वर्षात मतदार संघातील शेवटच्या घटकांपर्यंत असलेल्या नागरिकांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आपण विविध उपक्रम राबवले, समाजातील प्रत्येक घटकातील नागरिक सक्षम झाला तरच राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास होईल. आज आपण बघता राज्यातील वातावरण कसे आहे, लोक एकमेकांची घरे पेटवायला निघाली आहेत. परंतु मी माझ्या मतदार संघात चुली कश्या पेटतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. यापुढे देखील समाजातील सर्व घटकांसाठी न्याय देण्याचे काम केले जाईल असे वचन दिले.

समाजामध्ये निराधार, विधवा परितक्त्या महिलांना रोजगाराचे साधन नसल्याने त्यांना अनेक आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. कुटुंबात कर्ता पुरुष नसल्याने अशा महिलांना शासकीय योजनांचा देखील लाभ मिळत नाही. त्यामुळे अशा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी पुढाकार घेतला असून पहिल्या टप्प्यात परभणी विधानसभा मतदारसंघातील पाच हजारहून अधिक महिलांना मोफत शिलाई प्रशिक्षण आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी माँसाहेब मीनाताई ठाकरे विधवा परितक्त्या स्वावलंबन संकल्प योजना राबविण्यात येत आहे.अशी माहीती आमदार डॉ.पाटील यांनी यावेळी बोलताना दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी तळेकर, विशू डहाळे, ऋषी सावंत, गणेश मुळे, मकरंद कुलकर्णी, कपिल मकरंद, राहुल गायकवाड, गौरव तपके, प्रल्हाद देवडे, गंगाधर यादव, खंदारे, चट्टे व इतर शिवसैनिक व युवा सैनिक यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या