💥सेनगांव तालुक्यातील नागा सिनगी फाट्यावर गावकऱ्यांच्या वतीने भव्य रस्तारोको आंदोलन.....!


💥आंदोलना वेळी पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

सेनगांव तालुक्यातील नागा सिनगी फाट्यावर आज विविध गावातील नागरिकांच्या वतीने रास्तारोको आंदोलन छेडण्यात येत आहे. सेनगांव तालुक्यातील नागा सिनगी ते पळशी दरम्यानच्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले अाहे.व याचा नाहक त्रास परिसरातील नागा सिनगी,कारेगांव,शिवनी बुद्रुक शिवनी खुर्द,पळशीसह इतर गांवातील नागरिकांना व तसेच प्रवाशांना करावा लागत असल्यामुळे नागरिकांच्या वतीने आज दिनांक 27 जुलै रोजी सेनगांव-आजेगांव रोडवरील नागा सिनगी फाट्यावर रास्तारोको आंदोलन छेण्यात येत आहे. 

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा नागरिकांनी प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले मात्र अद्यापही या निवेदनाची दखल घेण्यात न आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून हे आंदोलन पुकारले आहे. तसेच या ठिकाणी सेनगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व तसेच या ठिकाणी आंदोलन कर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला आहे.सदरचे हे रास्ता रोको आंदोलन शेतकरी नेते मारोती गीते, माजी सरपंच राजकुमार काळबांडे,माजी सरपंच रमेशराव कुटे, बळीराम कुटे यांच्या नेतृत्वाखाली सदरचे हे रास्तारोको आंदोलन पुकारण्यात येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या