💥परभणी येथील शासकीय तंत्र प्रशाला केंद्र तथा कनिष्ठ महाविद्यालय बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू...!


💥बायफोकल टेक्निकल अभ्यासक्रमाबाबत आवाहन💥

परभणी, (दि.25 जुलै) : शासकीय तंत्र प्रशाला केंद्र तथा कनिष्ठ महाविद्यालय स्टेडियम मागे परभणी येथे बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया जूलै 2022 पासून सुरू झाली आहे. 11 वीच्या संलग्न महाविद्यालयातून विज्ञान, कला व वाणिज्य शाखेला प्रवेश घेवून विद्यार्थ्यांनी बायफोकल (व्दिलक्षी) टेक्निकल अभ्यासक्रमाची निवड करावी. या महाविद्यालयात अभ्यासक्रमासाठी प्रवेशाकरिता एकूण 150 जागा उपलब्ध आहेत. त्यात 1) इलेक्ट्रिकल मेंटेनन्स 2) मेकॅनिकल मेंटेनन्स व 3) स्कूटर मोटर सायकल सर्व्हिसींग या विषयांकरिता प्रत्येकी 50 जागा उपलब्ध आहेत. या वर्षापासून 12 वी चे गुण व CET/JEE ला मिळालेले गुण हे समप्रमाणात (प्रत्येकी 50% ) पुढील इंजिनिअरींग अथवा अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धरण्यात येणार असल्याने नुकतेच सरकारने जाहीर केले आहे.

            परभणी शहर परीसरातील भारत भारती क. महाविद्यालय, संत तुकाराम क. महाविद्यालय., आनंद क.महाविद्यालय, एन.व्ही.एस. मराठवाडा क. महाविद्यालय, ज्ञानोपासक क. महाविद्यालय, ज्ञानसरस्वती क. महाविद्यालय., शारदा क.महाविद्यालय, डॉ. झाकीर हूसेन क.महाविद्यालय, ग्यानदेवराव बोर्डेकर क.महाविद्यालय, कोद्री, परभणी, टी पाटील क.महाविद्यालय, धारासूर, परभणी महाविद्यालये शासकीय तंत्र प्रशाला केंद्र तथा कनिष्ठ महाविद्यालय परभणी यांचेशी संलग्न आहेत. संलग्न महाविद्यालयातून प्रवेश घेवून बायफोकल (द्वीलक्षी) अभ्यासक्रम विषयाची संबंधीत संस्थेतील विद्यार्थ्यांनी निवड करावी. त्यामूळे अभियांत्रिकी अभ्यासक्रम किंवा पॉलिटेक्नीकच्या थेट व्दितीय वर्षास प्रवेशासाठी लाभ होईल. असे मुख्याध्यापक, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या