💥सेनगाव येथील महावितरणच्या भोंगळ व गलथान कारभाराच्या निषेधार्थ कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन...!


💥तालुक्यातील अनेक गावांमध्ये अव्वाच्या सव्वा विज बिल वसूली💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

सेनगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरणच्या भोंगळ कारभार चालु आहे त्या संदर्भात आज सेनगाव येथील महावितरणच्या कार्यालय बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. 


सेनगाव तालुक्यातील जांबदया येथील आदिवासी वस्तीतील विद्यूत पुरवठा करण्यासाठी तेथील ग्रामस्था कोटेशन भरण्यासाठी तयार आहेत सदरील कागदपत्रे देऊन 8ते 10 महिने झाले आहेत मात्र या मागासवर्गीय कडे त्या संदर्भात कोणताही प्रस्ताव तयार केलेला नाही व लोकांचे कोटेशन देखिल स्वीकारत नाहीत आपल्या कार्यालची हिच परिस्थिती सर्वच भागात आहे मेंटेनन्स च्या बाबतीत देखिल वारंवार माहिती देऊन सुध्दा आपल्या कार्यालकडून कोणतीही कार्यवाही होत नाही सदरील गुत्तेदार देखिल महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे बोट करतात अनेक ठिकाणी तारा लोंबकळत आहेत खंबे तुटलेले नादुरुस्त रोहित्र याला सर्वच अधिकारी जबाबदार आहेत ? मात्र वसुली साठी सर्व अधिकारी तत्पर आहेत मग ग्रामस्थाकडून जशी वसुली करता तशी सुविधा देखिल पूरवा अनेक गावातील वसुली साठी लाईट बंद केली जात आहे जोपर्यंत वसुली नाही तोपर्यंत लाईट कट करत आहेत तसेंच तालुक्यातील अनेक गावांमध्ये अव्वाच्या सव्वा विज बिल आले आहेत याला सर्वच महावितरणचे अधिकारी जबाबदार आहेत महावितरणच्या विरोधात आज सेनगाव येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या वतीने महावितरणच्या कार्यालय बाहेर आंदोलन करण्यात आले आहे 

*प्रमूख मागण्या*

1,,,,कायम विद्यत बंद ,2,,,,चालू,

आव्वच्या सव्वा बिल ,लोबंकाळलेले तार मोडकळीस आलेले पोल,मेंटनंसचा गोधळ

3,,,कोणत काम होत नाही,4,,,खराब झालेले ट्रांसफार्मर 15 ,15,दिवस जाग्यावर,,,

5,,,,,वसुली बाबत कायम सशेमेरा लोंकाच्या पाठीमागे,,

माहावितरण कार्यलयच्या भोंगळ गलताण कारभाराच्या निषेध करण्यासाठी कार्यलयाबाहेर आन्दोलन,,,,,,

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सेनगाव वतीने आंदोलन करण्यात आले आहे या वेळी उपस्थितीत 

       प्रदेश सचिव युवक परमेश्वर इंगोले ,राष्ट्रवादी सेनगाव तालुका अध्यक्ष रवींद्र गडदे ,राष्ट्रवादी युवक सेनगाव तालुका अध्यक्ष देविदास गाडे आदी सेनगाव तालुक्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या