💥प्रमुख अतिथी म्हणून नांदेड मनपाचे ज्येष्ठ नगरसेवक बापूराव गजभारे यांची प्रमुख उपस्थिती💥
पूर्णा (दि.14 जुलै) - बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक समिती व बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा यांच्यावतीने बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी भदंत डॉक्टर उपयुक्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वर्षावास व आषाढ पौर्णिमेनिमित्त दि.13 ला धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती भंते पयावंश, भंते व श्रामनेर संघाची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख अतिथी नांदेड महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक बापूराव गजभारे ,नांदेडच्या जील्हाकोषागर अधिकारी ज्योती बगाटे अभिनव विद्याविहार प्रशाला चे शालेय समितीचे अध्यक्ष विनोद अजमेरा प्रशासकीय अधिकारी दिलीपराव माने आदींची उपस्थिती होती.
सकाळी साडेपाच वाजता परित्राण पाठ व सूत्र पठण करण्यात आले. 12.30 वाजता पूजा विधी सत्कार समारंभ पार पडला. आपल्या प्रमुख धम्मदेशनेमध्ये भदंत डॉ. उपगुप्त महाथे रो यांनी वर्षावास व आषाढ पौर्णिमेचा महत्त्व विशद करताना सांगितले याच दिवशी सिद्धार्थ गौतम बुद्धांची आई यांना स्वप्न पडले आपल्या उ दरा मध्ये महान विभूती जन्म घेणार आहे. याच दिवशी पंचवर्गीय शिष्य भगवान बुद्धांना मिळाले.त्यांनी त्यांचा उपदेश अंगिकारून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला.वर्षावसाची सुर वात आषाढ पौर्णिमा पासूनच झाली.
धम्माचा उपदेश अनुसरला तर त्या मधून श्र्वास्व वत समाधान व मानवाची सर्वंगिन प्रगती होते. या प्रसंगी संबोधित करताना ज्योती बगाटे यांनी धम्म म्हणजे काय धम्म म्हणजे शील,सदाचार मंगल मैत्रीने जीवन व्यतीत करणे.
असा आहे. बा पुराव गजभा रे यांनी राजकीय सामाजिक धार्मिक कार्य निस्वार्थी पने करण्याची प्रेरणा मला धम्म पासून मिळाली. या कामा मध्ये भदंत डॉ. उपगुप्त महा थे रो यांचे मला नेहमीच मार्गदर्शन असते.
धम्म देशनेनंतर रुक्मीनबाई गंगाराम कांबळे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त सुरेश गंगाराम कांबळे व परिवारातर्फे खीररदान करण्यात आले.
वरील कार्यक्रमास री.पा. ई नेते प्रकाश कांबळे नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड कामगार नेते अशोक कांबळे माजी नगरसेवक अशोक धबाले मिलिंद कांबळे लक्ष्मीकांत धुतराज साहेबराव सोनवणे इंजिनीयर पी.जी रणवी र विजय जोंधळे दिलीप गायकवाड बौद्धाचार्य त्रंबक कांबळे शिवाजी थोरात आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमा वाहुळे बौद्धाचार्य उमेश बा रहाटे अमृत कऱ्हा ळे राम भालेराव सुरज जोंधळे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले....
0 टिप्पण्या