💥परळी तालुक्यातील प्रत्येक श्रावण सोमवारी रस्त्यावरील मास विक्रीसह उघड्यावरील मास विक्री दुकाने बंद करा - डॉ.संतोष मुंडे


💥अशी मागणी धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे💥

 परळी वैजनाथ (दि.२७ जुलै) :- शहरात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशाच्या विविध भागातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात, शुक्रवार 29 जुलैपासून हिंदु धर्मियांचा पवित्र असा श्रावण महिना सुरू होत असून या कालावधीत अनेक राज्यातून लाखो भाविक प्रभू वैद्यांनाथाच्या दर्शनासाठी येणार आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या मुखरस्त्या वरील व तालुक्यातील श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मास विक्री व रस्त्यावरील मास विक्रीचे दुकाने तात्काळ बंद करावी अशी मागणी धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केली आहे.

         बारा ज्योतिर्लिगांपैकी पाचवे एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शनासाठी लाखो भाविक परळीत येतात. श्रावण महिन्यात राज्य भरातून लाखो भाविक श्री वैद्यनाथ प्रभूच्या दर्शनासाठी येत असतात. या कालावधीत शहराच्या व तालुक्यातील मुखरस्त्यावर रस्त्यावर व उघड्यावरच मास विक्रीचे दुकाने आहेत. हे दुकाने श्रावण महिन्याततील प्रत्येक सोमवारी पूर्ण पणे बंद करण्यात यावित तसेच बीड - परळी , गंगाखेड -परळी, अंबाजोगाई - परळी व उड्डाण पूल परिसर या शहराच्या मुख रस्त्या लागतच अनेक ठिकाणी उघड्या वरच मांस विक्री केली जाते.  शहरामध्ये व तालुक्यातील असलेली उघड्या वरील मांस विक्री तात्काळ बंद करणे आवश्यक आहे. या गंभीर दखल घेऊन परळी शहरातील मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील उघड्या वरील चालणारी मांस विक्री श्रावण महिना संपे पर्यंत तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणीचे उपजिल्हाधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी संभाजीनगर पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे. अशी माहिती ही  धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या