💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या हेडलाईन्स...!


💥अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि पुण्यातील शाळा बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश💥

 ✍️ मोहन चौकेकर 

येत्या 24 तासांत हैदराबाद, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, मराठवाडा आणि तेलंगणामध्ये अतिवृष्टीचा अंदाज, नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी. 

* अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि पुण्यातील शाळा बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश.

* पालघरमध्ये सात वर्षाच्या मुलीला झिका विषाणूची लागण ; राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती.

* वैतरणा नदीत अडकले 13 कामगार ; सहा जणांना वाचविण्यात यश,जिल्हा प्रशासनाचे बचावकार्य सुरु  

* विश्वचषक शूटिंग स्पर्धेत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू मानेला मिश्रमध्ये सुवर्णपदक. 

* 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित.

* पेट्रोल 5 रुपये, तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार,* सरकारची पहिली मोठी घोषणा

* मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

* द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून दिमाखदार स्वागत

 * “तुम्हाला तर एखाद्याने वर्तमानपत्र वाचण्यावरही आक्षेप असावा” सर्वोच्च न्यायालयाने NIA ला फटकारलं.“तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण हाताळत आहात, ते पाहाता तुम्हाला तर एखाद्या व्यक्तीने साधं वर्तमानपत्र वाचण्यावर देखील आक्षेप असावा”.

* पॉलिमर केमिस्ट्री मध्ये करियरच्या संधी : एमआयटी - डब्ल्यूपीयूमधील पॉलिमर केमिस्ट्री अभ्यासक्रम.

* पुणे : आणीबाणीत कारावास सोसलेल्यांना पुन्हा निवृत्तीवेतन ; जिल्ह्यातील ५३३ जणांना लाभ आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या नागरिकांना देण्यात येणारी निवृत्तीवेतन योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

* शेतकऱ्याने हौशीसाठी चारचाकीच्या किंमतीत खरेदी केला खिलार खोंड : मध्यमवर्गिय कुटुंबाचे साजेशा घराबरोबर चारचाकी स्वमालकीची असावी असे स्वप्न असतेच.

* विदर्भ-मराठवाडा सीमेवरील ‘सहस्त्रकुंड’ धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पर्यटकांना धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहता यावे म्हणून प्रशासनाने उंच मनोरे तयार केले आहेत.

* डोलो-६५० गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांना देण्यात आलं हजार कोटींचं गिफ्ट, प्राप्तिकर विभागाचा दावा प्राप्तिकर विभागाने ६ जुलैला बंगळुरुमधील स्थित मायक्रो लॅब्स लिमिटेडशी संबंधित नऊ राज्यांमधील ३६ ठिकाणी छापे टाकल्यानंतर हा दावा केला आहे.

* मुंबई : प्रवाशांना झटपट तिकीट मिळणार ; पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकात आणखी २६३ एटीव्हीएम मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना झटपट तिकीट देण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुंबई विभागाच्या स्थानकातील एटीव्हीएमची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

* राज्यात पीक कर्जवाटपात व्यापारी बँकाची टाळाटाळ; उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ५५ टक्के कर्जवाटप पेरण्या पूर्ण होत आल्या तरी  राज्यातील गरजू शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांचे खेटे घालावे लागत आहेत.

* वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय टी-20 संघाची घोषणा,* कोहली-बुमराह संघात नाही....

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या