💥परभणी येथे जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन....!


💥जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयामार्फत सन 2022-23 या वर्षासाठी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन💥

परभणी (दि.8 जुलै) : जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयामार्फत सन 2022-23 या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 14 वर्ष मुले व 17 वर्षावरील मुला-मुलींची क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा दि.13 व 14 जुलै 2022 या कालावधीत होणार आहे. तरी इच्छुकांनी स्पर्धेची प्रवेशिका दि.12 जुलै 2022 रोजी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत दाखल कराव्यात. ही स्पर्धा जाकीर हुसेन कॉलेजच्या  मैदानावर संपन्न होणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा क्रिडा  कार्यालयाशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या