💥परभणीतील गांधी नगर धार रोड येथील शेख अलिम शेख सलीम या हरवलेल्या व्यक्तीची माहिती देण्याचे आवाहन.....!


💥नांदेडला जावून येतो असे सांगून शेख अलिम शेख सलीम हा दि.17 जुलै पासून बेपत्ता आहे💥

परभणी (दि.22 जुलै) : गांधी नगर,धार रोड परभणी येथील शेख अलिम शेख सलीम वय 30 वर्ष हा व्यक्ती दि. 17 जुलै, 2022 पासून त्याच्या राहत्या घरातून नांदेडला जावून येतो असे सांगून गेला आहे. परंतू अद्यापपर्यंत तो घरी परत आलेली नाही. याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात मि.क्र.39/2022 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. व्यक्तीचा रंग सावळा असून चेहरा लांबट आहे. उंची 5 फुट, बांधा सडपातळ असून पांढऱ्या रंगाचे शर्ट व काळया रंगाची जिन्स पॅन्ट असा ड्रेस परिधान  केलेला आहे. या वर्णनाचा व्यक्ती दिसून आल्यास संबंधितांनी नानलपेठ पोलिस ठाणे, परभणी (मो. 9763580440)  यांच्याशी संपर्क साधावा, असे पोलिस निरीक्षक, नानलपेठ पोलिस ठाणे, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या