💥राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले💥
नांदेड (दि.१४ जुलै) - येथील सामाजिक कार्यकर्ते सरदार मनबिरसिंघ पिता सरदार ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या, प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र, राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी त्यांना दिले आहे.
स.मनबिरसिंघ ग्रंथी या युवक कार्यकर्त्याने, शीख समाजातील सामान्यजनांच्या, नांदेड गुरुद्वारा बोर्ड आणि तेथील कारभारा विषयीच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय विविध सामाजिक कार्यात ते हिरीरीने अग्रेसर असतात . गत अकरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत असणाऱ्या स.मनबीरसिंघ हे युवक सेलचे राज्य कार्यकारणी समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यानंतर पक्षाचे कार्य वाढवण्यासाठी ग्रंथी यांना, जिंतूर-गंगाखेड या दोन विधानसभांच्या निरीक्षक पदी निवडले. समाजासाठी आणि पक्षासाठी स.मनबिरसिंघ ग्रंथी हे सातत्याने करत असलेल्या कार्याची दखल घेत, यावेळी पक्षाने त्यांना राष्ट्रवादी युवक कांग्रेस प्रदेश सचिव पदी नियुक्त केले आहे. या नियुक्तीबद्दल ग्रंथी यांचे पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचे चाहते यांनी अभिनंदन केले आहे...
0 टिप्पण्या