💥अज्ञात चोरट्याने केला १ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास💥
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील बसवेश्वर नगरमधील घराला कुलूप नसल्याचा फायदा घेत चोरट्याने भर दिवसा दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवार, दि. २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घडली. याविषयी सविस्तर माहिती अशी की, कौसडी येथील बसवेश्वर नगर येथील रहिवासी लक्ष्मणराव गणपतराव जीवने यांच्या घरातील पुरुष व्यक्ती कामानिमित्त बाहेर गेले होते घरातील महिला घराच्या दरवाज्याला कोंडा लावून गावाजवळील मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कोंडा उघडून घरात प्रवेश केला घरातील कपाटाला लॉक न लावल्याने कपाट उघडून कपाटातील तिजोरी व ड्रॉवरचे कुलूप तोडून सोन्याच्या दोन अंगठ्या, झुंबर, सेवन पीस, कानातले झुमके असे अंदाजे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
गावातील मंदिरातून देवदर्शन करून जीवने यांची दोन मुले घरी आल्यावर घराचा दरवाजा व कपाट उघडे असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घरात येऊन पाहिले असता कपाट उघडे असल्याचे त्यातील सामान अस्थाव्यस्थ पडलेले दिसून आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती बोरी पोलीस ठाण्यात दिली. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत मुळे सहका-यांसह घटनास्थळी आले. परभणी येथील ठसे पथकालाही बोलावण्यात आले होते. या घटनेमुळे गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे बोरी पोलिसांच्या कारवाईकडे आता सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.....
0 टिप्पण्या