💥वनामकृविचा नाविन्यपूर्ण उपक्रम💥
शेतकरी महिला अनेक आघाडीवर कार्य' करताना शेती कामे सांभाळून कुटुंबामध्ये ही महत्त्वाची भूमिका साकारतात म्हणून शेतकरी महिलांना सदैव सन्मानाने वागणूक मिळावयास हवी असे प्रतिपादन डॉ.धर्मराज गोखले यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले शेतकरी महिला सन्मान वर्ष 2022 आणि 1 जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने साजरा करण्यात येत असलेल्या कृषी दिनी सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि, विद्यापीठ परभणी द्वारा कृषी विभाग, पूर्णा महिला आर्थिक विकास महामंडळ आणि पंचायत समिती पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे धानोरा (काळे) ता. पूर्णा येथील शेतकरी महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. धर्मराज गोखले, (संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता )(कृषि)यांनी विशद केले.याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या आयोजक डॉ. जया बंगाळे, (सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य), प्रमुख अतिथी श्रीमती पल्लवी टेमकर, (तहसीलदार पूर्णा), बालाजी झिंजाडे, (जिल्हा समन्वयक अधिकारी माविम), रामचंद्र तांबिले, (तालुका कृषी अधिकारी पूर्णा), प्रताप काळे, उद्यान पंडीत, दहिवडे, (कृषि अधिकारी, (पं.स. पूर्णा,) उपसरपंच कैलास काळे यांची विशेष उपस्थिती होती.
मुलांनाही आपल्या शेतकरी माते विषयी अभिमान वाटावा म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीस माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली या दरम्यान शेतकरी महिला सन्मानार्थ विद्यार्थ्यांच्या "शेतात राबते माजी माय, तिच्या कष्टाला तोड नाही," "शेतकरी मातेचा आम्हाला गर्व, तिची काळजी घेऊ आम्ही सर्व," "शेतात राबते आई सतत, घर कामात तिला करू मदत," " घरात शेतात कामच काम, शेतकरी महिलांना आमचा सलाम," " निंदणी खुरपणी करते माझी माय, जणू काही तिच्या हाती जादूच हाय," अशा घोषणांनी सर्व गाव दणाणून गेले.तदनंतर शेतकरी महिला मेळाव्यामध्ये कृषि विभाग, महसूल कर्मचारी, प्रगतशील शेतकरी, ग्रामस्थ यांनी सुचविलेल्या "26 कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यांचा" मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव सन्मानपत्र, शाल, फळझाडांचे रोप आणि तंत्रज्ञान पुस्तिका देऊन करण्यात आला. यावेळी सन्मानार्थी महिला शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा उद्यान पंडित शेतकरी प्रताप काळे यांनी सादर केली. यावेळी सन्मानार्थी महिला आणि ग्रामस्थ अतिशय भावूक झाले.विविध दिन शाळा महाविद्यालयामध्ये साजरे केले जातात, परंतु कृषि दिनी शेतकरी महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान महिला शेतकऱ्यांच्या गावात येऊन सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाने साजरा केला याबाबत समाधान व्यक्त करून असे कार्यक्रम अनेक गावात व्हावेत अशी अपेक्षा पूर्णे च्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या आयोजक डॉ.जया बंगाळे यांनी शेतीकाम, घरकाम, आर्थिक, सामाजिक व्यवहार सांभाळताना शेतकरी महिलांनी आपले मानसिक स्वास्थ्याची जपणूकही केली पाहिजे असे स्पष्ट केले. तसेच सामुदायिक विज्ञान तंत्रज्ञानावर डॉ. तसनिम नाहिद खान, डॉ. सुनिता काळे, डॉ. विणा भालेराव, डॉ. जयश्री रोडगे, डॉ. शंकर पुरी यांनी शेतकरी महिलांना विविध उपयुक्त विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुपचे अमृतराज कदम,सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव भोसले गोविंद दुधाटे, बालासाहेब हिंगे, पांडुरंग शिंदे, मोतीराम दुधाटे, उद्धव दुधाटे, माजी मुख्याध्यापक श्री अशोक रसाळ, मुख्याध्यापक श्री गाडेकर ,मंडळ अधिकारी निलेश अडसूळ,कृषी पर्यवेक्षक प्रवीण काळे,कृषी सहायक डोंगरे,सुरेश काळे ,ग्रामसेवक गुणाजी पाचपुंजे ,शिवाजीराव काळे,शत्रुघ्न काळे, यांची प्रमुख उपस्थिती होती या ग्रुपचे सदस्य ऍड.दिनेश काळे यांनी शेतकरी मातांनी केलेले अपार कष्ट व ते करत असताना आलेल्या अडचणीवर मात करून मिळविलेल्या विजय हा, सन्मान कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आला अशा आपल्या भावना व्यक्त केल्या तर प्रयोगशील शेतकरी बालासाहेब हिंगे यांनी ग्रामीण भागात शेती किंवा इतर व्यवसाय करून आपले कुटुंब चालवणाऱ्या मुलाबाळांना शिकवणाऱ्या त्यांच्यावर चांगले संस्कार करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांची उमेद वाढवली याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. जया बंगाळे,( सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. शंकर गणपत पुरी, विषय प्रमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. विणा भालेराव यांनी व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रताप काळे, जनक काळे, कृष्णा काळे, सुधाकर काळे, श्रीकांत काळे, भगवानराव काळे, बालाजी काळे, प्रकाश काळे या ग्रामस्थ मंडळींनी तसेच आत्माचे श्री विलास जोशी, रवी माने , महाविद्यालयाचे प्रल्हाद थोरात, रामा शिंदे आणि अलीम शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमांमध्ये धानोरा काळे पंचक्रोशीतील शेतकरी बंधू भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून कृषि दिन उत्साहात साजरा केला आणि खूप आनंद झाल्याच्या भावना व्यक्त केल्या...
0 टिप्पण्या