💥डॉक्टर जयदीप देशमुख नांदापूरकर यांची कळमनुरी विधानसभा प्रभारी पदी निवड....!


💥त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली येथील प्रसिद्ध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ तथा भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य केलेले श्री जयदीप राव देशमुख नांदापूरकर यांची कळमनुरी विधानसभा प्रभारी पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीचे भाजपा सह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

       येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ,नगरपरिषद, निवडणुकीमध्ये आपले प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी, कळमनुरी विधानसभा क्षेत्रामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी कळमनुरी मतदार संघात प्रसिद्ध असलेले  डॉ.जयदिप देशमुख नांदापूरकर यांची भाजपा प्रभारी कळमनुरी विधानसभा पदी निवड करण्यात आली. त्याच प्रमाणे त्यांची कळमनूरी मधुन - हिंगोली लोकसभा प्रवास योजनेच्या कोअर कमीटी मध्ये हि नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील निवड  संघटन मंत्री संजयजी कौडगे , भाजपा जिल्हाध्यक्ष रामरावजी वडकुते ,हिंगोलीचे तानाजीराव मुटकुळे यांनी केली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल मा. खा. शिवाजीराव माने, मा. आ. गजाननराव घुगे मा. नगराध्यक्ष बाराराव बांगर  यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.डॉक्टर जयदीप देशमुख नांदापूरकर यांची निवड झाल्यामुळे कळमनुरी विधानसभा मतदारसंघात भाजपाची ताकद नक्कीच वाढणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या