💥परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे दि.१ आगस्ट पासून आगामी काळातील महाभरती पुर्व मोफत मार्गदर्शन बॅचेसला सुरूवात...!


💥विश्वशांती स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक केंद्राकडून आयोजन💥

परभणी (दि.२४ जुलै) - जिल्ह्यातील पाथरी येथे विश्वशांती सेवाभावी संस्थेच्या वतीने विश्वशांती स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक केंद्रा मार्फत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहेजाद लाला यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत होतकरू व गरजवंत विद्यार्थ्यांसाठी दि.०१ आगस्ट २०२२ पासून आगामी काळातील महाभरती पुर्व मोफत मार्गदर्शन बॅचेसला सुरूवात करण्याचा महत्वपुर्व निर्णय घेतला असून पोलिस भरती,तलाठी,ग्रामसेवक,कनिष्ठ लिपीक,वरिष्ठ लिपीक,ग्रुप सी आणि ग्रुप डी संपूर्ण तयारी संदर्भात मार्गदर्शक बॅचेसला सुरूवात होणार आहे.

या आयोजित महाभरती पुर्व मोफत मार्गदर्शन केंद्रात आनंद धनले सर ( एमएबीएड मराठी),कांबळे सर (एम कॉम बीएड अंकगणित),हिंगे सर (एमएबीएड /जीएस)आव्हाड सर (बिएबीएड/इंग्रजी),डॉ.सलिम सर (बिएएमएस सायन्स) आदी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार असून या बॅचेसला सुरूवात दि.०१ आगस्ट २०२२ रोजी होणी असून या मार्गदर्शक बॅचेसची वेळ सकाळी ०८-०० ते ११-०० वाजेपर्यंत राहणार असून या मार्गदर्शक बॅचेस मध्ये सहभाग नोदविणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी तात्काळ करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष शहेजाद लाला यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक 9960008950 या क्रमांकावर संपर्क साधावा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या