💥आदर्श व संस्कार क्षम माता गिरजाबाई बन्सी कांबळे काळाच्या पडद्याआड....!


💥प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये व अडचणीमध्ये धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव होता💥  

पूर्णा (दि.२३ जुलै) - पूर्णा शहरातील आंबेडकरी चळवळीतील व धम्म चळवळीतील आदर्श धम्म उपासिका व संस्कार क्षम माता गिरजाबाई बन्सी कांबळे यांचे वयाच्या 89 व्या वर्षी नांदेड या ठिकाणी दवाखान्यामध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

संपूर्ण नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार व समाजामध्ये त्यांची वेगळी ओळख होती प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये व अडचणीमध्ये धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव घरी आल्या ल्यांच आदर तित्थ व पाहुणचार प्रेमळ व अथिती त्यशील स्वभाव प्रत्येकाला भावत असे पती दिवंगत बन्सी कांबळे भारतीय रेल्वेमध्ये नोकरीला होते आंबेडकरी व धम्म चळवळीमध्ये त्यांचे जीवन समर्पित होतं.

घरामध्ये नेहमी चळवळीमधील कार्यकर्त्यांची ये जा असायची प्रसन्न अंतकरणाने मनाने प्रत्येकाचं त्या स्वागत करायच्या 1959 मध्ये पूर्णा शहरामध्ये नागपूर मुक्कामी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व पाच लाख अनुयायांना धम्मदीक्षा देणारे पूज्य भदंत चंद्रमणी महाथे रो यांच्या हस्ते धम्मदीक्षा सोहळ्याचा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या आयोजनामध्ये दिवंगत बन्सी कांबळे यांनी तन-मन धनाने स्वतःला झोकून दिले होते त्यांना समर्थ साथ देण्याचे काम पत्नी या नात्याने गिरीजाबाई यांनी केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिव्य संदेश शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे व जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा विचार त्यांनी अंगीकारला.

परिस्थिती अभावी आपणाला शिक्षण घेता आलं नाही परंतु आपल्या सर्व मुला मुलींना त्यांनी उच्चशिक्षित केलं ज्येष्ठ चिरंजीव शंकर कांबळे रेल्वे मधून उच्च पदावरून सेवानिवृत्त झाले दुसरे चिरंजीव सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत पॅंथर चळवळीतील अग्रणी रिपाईचे ज्येष्ठ नेते  पूर्णा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश कांबळे एसटी महामंडळातून अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले गौतम कांबळे पूर्णा नगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी उत्तम कांबळे यांच्या त्या आई होत्या आई वडिलांचा विचाराचा समृद्ध वारसा सर्वजण समर्पित पने चालवत आहेत.

त्यांच्या कन्या सुद्धा आईच्या शिकवणीनुसार वाटचाल करत आहेत दिनाक 21 ला त्यांचे निधन झाले.दिनाक 22 ला अतिशय शोकाकुल वातावरणात  भदंत डॉ. उपगुप्त महाथरो भंते पाय्यावश भंते प यानंद यांच्यां प्रमुख उपस्थिती मध्ये  11वाजता अंतिम संस्कार करण्यात आले.या वेळी जेष्ठ आंबेडकरी चळवळीतील विचारवंत सुरेशदादा गायकवाड,विजय सोनवणे,परभणीचे महापौर प्रतिनिधी रवी सोनकांबळे ,भीम प्रकाश गायकवाड,पूर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रतीनिधी संतोष एकलारे,माजी गटनेते उत्तम खंदारे,जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.रवी गायकवाड व्यापारी महासंघाचे विशाल चितलांगे माजी नगराध्यक्ष दिलीप हणमंते सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित डॉ.श्रीहरी कांबळे साहित्यिक डॉ. प्रकाश मोगले डॉ.आदिनाथ इंगोले पोलीस अधिकारी मारकड  आदींनी श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले.भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी सूत्रसंचालन केले.

या वेळी सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर  आप्तेष्ट नातेवाईक  मोठ्या संख्येने उपस्थित होते भदंत डॉ उप गुप्त महाथेरो,भंते पयानंद,भंते पयावांश यांनी पुजाविधी अंतिम संस्कार पार पाडले. पूजा विधी सहकार्य बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अतुल गवळी उमेश बराटे अमृत कऱ्हाळे आदींनी केले. त्यांच्या पुण्यानुमोदन अर्थात जलदान विधीचा कार्यक्रम दिनांक चोवीस जुलै रोज रविवार दुपारी बारा वाजता त्यांच्या राहत्या घरी आयोजित केला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या