💥आता जातीनिहाय जनगणनेच्या लढ्यासाठी सज्ज रहावे - गोविंद यादव


💥अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा ओबीसी नेते गोविंद यादव यांनी व्यक्त केली💥

गंगाखेड : सर्वोच्च न्यायालयाने आज स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कायम केले. ही बाब निश्चितच आनंददायी आहे. परंतू, आज स्विकारण्यात आलेल्या बांठीया आयोगाने ओबीसींची संख्या कमी दर्शवलीय याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ओबीसी बांधवांचा पुढचा लढा जातनिहाय जनगणनेसाठी असला पाहिजे. यासाठी ओबीसी बांधवांनी सज्ज राहीले पाहिजे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा ओबीसी नेते गोविंद यादव यांनी व्यक्त केली.


 
ओबीसी आरक्षण निकालाच्या पार्शभूमीवर ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारने आयोग नेमला. आयोगाकडून आवश्यक तो डाटाही जमा केला गेला. परंतू हा डाटा संकलीत करत असताना आडनावावरून जाती ठरवण्यात आल्या. परिणामी ओबीसींची जनसंख्या अतीषय कमी होवून ती केवळ ३६ टक्के दाखवली गेली. वस्तुतः मागील काळात ५२ ते ५४ टक्के असलेली ओबीसींची संख्या आता साठ टक्क्यांपर्यंत पोहोचलेली असणार आहे. ही संख्या नेमकी किती हे समजण्यासाठी वस्तुनिष्ठ जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. ती करण्यासाठी आंदोलन ऊभे करण्याची आवश्यकता आहे. हे आंदोलन करण्यासाठी ओबीसी बांधवांनी सज्ज रहावे, असे आवाहन गोविंद यादव यांनी केले आहे. 

दरम्यान, आज गंगाखेड शहरात ओबीसी एल्गार परिषदेच्या वतीने न्यायालयाच्या निकालाचे जोरदार स्वागत करण्यात आले. येथील तहसील कार्यालयासमोर फटाक्यांची आतीषबाजी करून, पेढे वाटून आंनदोत्सव करण्यात आला. याप्रसंगी गोविंद लटपटे, सुरेश बंडगर, गोविंद यादव, बालाजी मुंडे, सखाराम बोबडे, मगर पोले, तुकाराम तांदळे, प्रा. मुंजाजी चोरघडे, राम फड ऊखळीकर,  माधव शेंडगे, साधनाताई फड, ॲड आदिनाथ मुंडे, प्रल्हाद मुंडे, मनोज मुरकुटे, संदिप लटपटे, संतोष मुंडे, बळी होळंबे आदिंसह एल्गार परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ऊपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या