💥जिंतूर तालुक्यातील घागरा येथे पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान.....!


💥घागरा येथील गट क्र.९८ मध्ये सीताबाई रामभाऊ राठोड यांच्या शेतात हा पाझर तलाव आहे💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर : तालुक्यातील घागरा येथे शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास एक तास झालेल्या मुसळधार पावसाने छोटा पाझर तलाव फुटल्याचा प्रकार घडला. त्यामुळे पाझर तलावाचे पाणी लगतच्या मोठ्या तलावात गेल्याने परिसरातील शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सरपंच रामकिशन बल्लाळ व पोलीस पाटील यांनी दिली आहे.

          जिंतूर तालुक्यातील घागरा येथील गट क्र. ९८ मध्ये सीताबाई रामभाऊ राठोड यांच्या शेतात हा पाझर तलाव असून, शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घागरा येथे एक तास मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, या पावसातच सदरील तलाव फुटल्याने घागरा येथील गट क्र. ६ आणि ८ मधील शेतकरी वसंत राठोड, अत्तम राठोड, सरपंच रामकिशन बल्लाळ यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. सदर पाझर तलावाच्या खाली मोठा तलाव असल्याने सदरील फुटलेल्या पाझर तलावाचे पाणी खालच्या बाजूला मोठ्या तलावात गेले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या