💥विद्याधर महाले हे चिखली विधानसभा मतदार संघाच्या भाजप आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांचे पती आहेत💥
✍️ मोहन चौकेकर
चिखली :- प्रशासकीय व मंत्रालयीन कामाचा दांडगा अनुभव असणारे विद्याधरजी दयासागर महाले यांची उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून नव्या सरकारमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. ते चिखली विधानसभा मतदार संघाच्या भाजप आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचे पती आहेत.
मा.विद्याधरजी महाले हे उच्चशिक्षित असून, स्पर्धा परीक्षेतून आधी त्यांची जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्ग २ पदावर नियुक्ती झाली होती. नंतर ते विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते ना. भाऊसाहेब फुंडकर यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्त झाले व तेव्हापासून त्यांनी मुंबई व मंत्रालयीन कामात चांगलाच जम बसवला. विनोद तावडे यांच्याकडे आधी ते विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेतेपद असताना त्यांचे खाजगी सचिव व नंतर विनोद तावडे यांच्या शालेय शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार असताना त्यांचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. युती सरकारच्या काळात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडेही त्यांनी सचिव पदाचा कार्यभार सांभाळला होता . सत्तापालट झाल्यावर पुन्हा ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे सची्व म्हणून होते व आता परत भाजपा सत्तेत येताच उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खाजगी सचिव म्हणून नियुक्ती दिली आहे. त्यांच्या या नियुक्तीने विशेषतः चिखली मतदार संघासह बुलडाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे मा. विद्याधरजी महाले यांच्या या नियुक्तीचा फायदा ते चिखली मतदारसंघासह संपूर्ण बुलढाणा जिल्हाचा विकासासाठी अनेक करोडो रुपयांच्या योजना आणुन त्यासाठी भरघोस अश्या निधीची सोय करुन चिखली मतदारसंघासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास निश्चितच करतील व यामुळे चिखली मतदारसंघासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात विकासाची गंगा निश्चितच वाहील अशी खात्री वाटते.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या