💥नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे पत्रकाराच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न...!


💥एका भुमाफियाने केलेल्या बेकायदेशीर बांधकामाचे फोटो काढणारे पत्रकार वाकोडीकर यांच्या अंगावर गाडी घातली💥 

पत्रकार संरक्षण कायदा झाला.. आम्ही आनंदोत्सव साजरा केला.. मात्र असा कायदा अस्तित्वात आहे हेच राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात माहिती नाही.. पत्रकार तक्रार घेऊन जातात तेव्हा असा कायदा आहे ? असा प्रश्न पोलीस अधिकारी विचारतात.. मग आम्हाला गॅझेटची प्रत, यापुर्वी कोठे गुन्हा दाखल झाला त्या एफआयआरची कॉपी द्यावी लागते.. तेव्हा कुठे गुन्हा दाखल होतो.. पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा आहे हेच जर पोलिसांना माहिती नसेल तर आम जनतेला ते कसं माहिती होणार ? त्या कायद्याचा धाक तरी कसा निर्माण होणार ? 

कायदयाबददलची शासकीय स्तरावरील ही अनास्था आणि अनेकदा कायदा माहिती असतानाही आरोपींना वाचविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करायलाच केली जाणारी टाळाटाळ यामुळे कायदा होऊन देखील पत्रकारांना या कायद्याचा उपयोग होत नाही.. २०१९ मध्ये कायदा अस्तित्वात आला.. मात्र आतापर्यंत राज्यात या कलमाखाली केवळ ३८ गुन्हेच दाखल होऊ शकले.. ही सरकारची आकडेवारी आहे.. या चार वर्षात किमान शंभर पत्रकारांवर तरी हल्ले झाले.. अन्य प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हे दाखल केले गेले नाहीत.. म्हणजे आरोपी मोकाट आहेत.. पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली तर पत्रकारांवरील हल्ले कमी होतील मात्र ती होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत..

ताजी घटना आहे किनवट मधील.. एका भुमाफियाने सुरू केलेल्या बेकायदेशीर बांधकामाचे फोटो काढणारे देशोन्नतीचे पत्रकार प्रदीप वाकोडीकर यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना परवा रात्री जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला.. यामध्ये वाकोडीकर गंभीर जखमी झाले आहेत.. त्यांच्यावर नांदेड येथे उपचार करण्यात आले.. आज त्यांनी यासंबंधी पोलिसात तक्रार दिली आहे..

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषद तसेच सोशल मिडिया परिषद वाकोडीकर यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करीत असून हल्लेखोरावर कडक कारवाई करावी अशी मागणी एस.एम देशमुख यांनी सरकारकडे केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या