💥गोरेगाव येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या कनेक्टिवीटी संदर्भात आमदारांनी लावला चक्क केंद्रीय अर्थराज्य मंत्र्याला फोन...!


💥आमदार तानाजी मुटकुळे यांनी थेट केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासी साधला संवाद💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील भारतीय स्टेट बँक शाखा कायमस्वरूपी ठेवण्यासाठी व नेटवर्क समस्या दूर करण्यासाठी चक्क हिंगोली विधानसभा मतदारसंघातिल आमदार तानाजी मुटकुळे यांनी थेट केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड यांच्यासी संवाद साधला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या गोरेगाव अपर तहसील कार्यालय दर्जा प्राप्त असलेल्या गोरेगावातीलच भारतीय स्टेट बँक ही इतर ठिकाणी हरवण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेला उधान आले होते.


परंतु भारतीय स्टेट बँक गोरेगाव शाखा ही स्थलांतर होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी व ग्राहकांना समस्याचा  सामना करण्याची वेळ येणार होती. भारतीय स्टेट बँक शाखेमध्ये जवळपास 22 गावे दत्तक आहेत.

 35 गावाचा जनसंपर्क असणारी ही शाखा असून अनेक वर्षापासून कार्यरत असलेली भारतीय स्टेट बँक हे ग्राहकांची मोठी पसंती ठरली असून या अगोदरही या शाखेने भारतामध्ये नंबर एक चे काम केल्याबद्दल शेतकऱ्यांना कर्ज वाटप तसेच वसुली बाबतही या बँकेने मोठी कामगिरी बजावली होती .

त्यामुळे गोरेगाव भारतीय स्टेट बँक ही भारतात नंबर एक आली होती बँक इतरत्र जाणार असल्याची चर्चा सुरू होती परंतु या चर्चेला कायमस्वरूपी बंद करण्यासाठी चक्क थेट हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याशी फोनवरून संपर्क साधून गोरेगावची स्टेट बँक ही इतरत्र जाऊ नये व या बँकेमध्ये सतत नेटवर्कचा प्रॉब्लेम होत असल्याची माहिती त्यांनी फोनवरून दिली .

तसेच परभणी येथील रीजनल बँकेच्या मॅनेजरची यांच्याशी संपर्क साधून दिला त्यामुळे गोरेगाव स्टेट बँक ही कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. व लवकरच गोरेगाव स्टेट बँक मधील कनेक्टिव्हिटी होईल व शेतकऱ्यांना व सर्व सामान्य ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील त्यामुळे गोरेगावची स्टेट बँक शाखा आता कायमस्वरूपी राहणार असल्याचे  हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे ,यांनी सांगितले आहे या वेळी उपस्थितीत गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या