💥परभणीत तमाम ओबीसी समाज बांधंवाचे जोरदार शक्तीप्रदर्शन....!


💥आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला प्रचंड मोठा मोर्चा💥

 💥ओबीसी आरक्षणाच्या न्यायीक मागणी साठी निर्णायक लढाईचा दिला इशारा💥

परभणी (दि.19 जुलै) :  स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसींच्या आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी सोमवारी (दि.18) परभणीतील  जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल ओबीसी समाजाच्या वतीने मोठा महामोर्चा काढण्यात आला.या मोर्चाद्वारे ओबीसी समाजबांधवांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा कायम सुरु ठेवणार असल्याचा निर्धार ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.


           ओबीसी समाजाच्या या महामोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर येथील शनिवार बाजारात सकाळपासून शहरासह जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी सुरु केली. ठिकठिकाणच्या तालुकास्थानांसह मोठ्या गावांमधून वाहनांद्वारे वाजत-गाजत झेंडे फडकवित हजारो कार्यकर्ते दाखल होत होते. सकाळपासून सर्वदूर ढगाळ वातावरण पसरले असतांनासुध्दा मोर्चातील समाजबांधवांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. शनिवार बाजारात या कार्यकर्त्यांनी झेंडे, बॅनर फडकवून तसेच जोरदार घोषणाबाजी करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. संपूर्ण जिल्हाभरातून आंदोलनकर्ते दाखल झाल्यानंतर या मोर्चास प्रारंभ झाला. प्रचंड पोलिस बंदोबस्तात, अभूतपूर्व जल्लोषात मोर्चेकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान केले. शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभुजा चौक, स्टेशन रोड, नारायण चाळ कॉर्नर व डॉक्टर हेडगेवार चौकातून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील मैदानावर दाखल झाला. या मार्गादरम्यान मोर्च्यातील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत संपूर्ण बाजारपेठ दणाणून सोडली. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय ठरली तर विविध पारंपारिक वेशभूषेतील महिला, कलावंत तसेच पारंपारिक वादकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

            माजी उपमहापौर ज्येष्ठ नेते भगवानराव वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. स्वराजसिंह परिहार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नानासाहेब राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष किर्तीकुमार बुरांडे, माजी आमदार रामराव वडकुते, कॉ. राजन क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण कार्याध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संतोष मुरकुटे, श्रीनिवासजी मुंडे, काँग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव, अविनाश काळे, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, सौ.शकुंतला मुंडे, राजेंद्र वडकर, माजी महापौर संगीता वडकर, मुंजाजी गोरे, लक्ष्मण बुधवंत, ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके, विशाल बुधवंत, गंगाप्रसाद आनेराव, शिवलिंग आप्पा खाकरे, माजी नगरसेवक सचिन अंबिलवादे सौ. नंदा राठोड, भाजपाचे अनंत बनसोडे, चंद्रकांत बोकन, सिद्धेश्‍वर गिरी, प्रदीप फाले, एकनाथ काळे, केशवराव बुधवंत, मुरलीधर मते, रमेश गीते, सुरेश भुमरे, गोपाळ गोरे, संपत सवणे, भवरे, प्रभाकर जयस्वाल, सचिन रासवे, अरुणा काळे, सौ. साधना राठोड, सौ. अश्‍विनी घोगरे, विश्‍वनाथ थोरे, अशोक भोसले, हनुमंत डाके, पंडितराव रासवे, अ‍ॅड. संजय केकान, वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. धर्मराज चव्हाण, राष्ट्रवादीचे कृष्णा कटारे, राजेश बालटकर, शुभम जाधव, सुमित परिहार आदींनी या मोर्चाच्या समारोपाच्या सभेतून निर्णायक लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

           यावेळी जिल्हाध्यक्ष बुरांडे यांनी प्रास्ताविकातून मोर्चामागील भूमिका मांडली. यावेळी अ‍ॅड. परिहार, नानासाहेब राऊत, विशाल बुधवंत, किरण सोनटक्के, रामप्रभू मुंडे, गंगाप्रसाद आनेराव, राजाभाऊ फड, अरुण काळे, अ‍ॅड. धर्मराज चव्हाण, मोईन मौली, विठ्ठलराव रबदडे, सौ. नंदा राठोड, सौ. साधना राठोड यांची भाषणे झाली. माजी उपमहापौर वाघमारे यांनी अध्यक्षीय समारोपातून निर्णायक लढाईचा इशारा दिला. सभेचे आभार बालटकर यांनी मानले.

          एका शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले. त्याद्वारे ओबीसी आरक्षण कायम ठेवा, ओबींसींची जातनिहाय जनगणना करा, ओबीसी आरक्षण लागू होईपर्यंत निवडणूका पुढे ढकला, मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागू करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणूका तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना देखील ओबीसी आरक्षणासंदर्भात काही ठोस निर्णय होऊ शकला नाही. तसेच यापुर्वी देखील झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत आम्ही 465 ओबीसींच्या जागेला मुकलो आहोत. खरे तर ओबीसी समाजाचे सभागृहात प्रतिनिधी नसणे हे घटनेचे अवमुल्यन तर आहेच शिवाय ओबीसी समाजाचे पुन्हा न भरून निघणारे नुकसान देखील आहे, अशी खंत शिष्टमंडळाने निवेदनातून व्यक्त केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या