💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीला यश : जोडपरळी जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या बांधकामासह शिक्षकांची नियुक्तीही होणार...!


💥प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगीत💥


परभणी (दि.२२ जुलै) - प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक १४ जुलै २०२२ रोजी परभणी तालुक्यातील जोड परळी येथील तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या निझामकालीन खोल्यांचे बांधकाम पाडण्यात आले होते परंतु जिल्हा परिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मागील वर्षी मंजूर झालेले वर्ग खोल्यांचे बांधकाम अद्याप सुरू झाले नाही. मंजूर नवीन वर्गखोल्या तात्काळ बांधण्यात याव्यात तसेच वर्ग पहिली ते आठवी अश्या आठ वर्गासाठी केवळ पाच शिक्षक असून उर्वरित चार रिक्त शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावीत या मागणीचे निवेदन देण्यात आले होते. या दोन्ही मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये दिनांक २२ जुलै २०२२ रोजी ठीया आंदोलन करण्याची घोषणा पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली होती. प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवेदनाची दखल जिल्हा परिषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिवानंद टाकसाळे यांनी घेऊन या संबंधीत प्रश्नाबाबत जबाबदार असणाऱ्या कार्यकारी अभियंता बांधकाम, जिल्हा परिषद परभणी व शिक्षणाधिकारी ( माध्यमिक व प्राथमिक ) यांना संबंधीत मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या नुसार दि. १९ जुलै २०२२ रोजी बांधकाम विभागाचे अभियंते व शिक्षण विभागाच्या पथकाने जोड परळी येथील शाळेचा दौरा करून अहवाल सादर केला.


दिनांक २१ जुलै २०२२ रोजी दुपारी संबंधीत अधिकाऱ्याची प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व पदाधिकाऱ्या सोबत एक संयुक्त बैठक घेण्यात आली यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने जोड़ परळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मंजूर व रखडलेल्या खोल्यांचे बांधकाम तात्काळ सुरू करणे बाबत संबंधीत ठेकदारांना व अभियंत्यांना लेखी सूचना दण्यात आल्या तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत संबंधीत शाळेतील शिक्षकांच्या रिक्त चार जागांपैकी एक जागेवर तात्काळ नियुक्ती करणे व उर्वरित तीन रिक्त नियुक्त्या पंधरा ते वीस दिवसात करणे बाबत लेखी सूचना देण्यात आल्या. या दोन्ही प्रकरणामध्ये तात्काळ कारवाही करण्याचे लेखी आश्वासन दोन्ही विभागामार्फेत प्रहार जनशक्ती पक्षास मिळाल्या नंतर व जिल्हा परिषद प्रशासनाच्या विनंती नंतर व लेखी आश्वासना नंतर काल दि. २१ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी प्रहार जनशक्ती पक्षाने दि.२२ जुलै २०२२ रोजी जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात होणारे ठिया आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात मागे घेण्यात आले आहे.

मागील तीन वर्षापासून तीन खोल्यामध्ये चालणारे आठ वर्ग व मंजूर नऊ शिक्षकांपैकी पाच शिक्षकांवर चालणाऱ्या जिल्हा  परिषद शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब शेतकर्यांच्या मुलांना शिक्षणासाठी नवीन वर्ग खोल्या व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांमूळे न्याय मिळाला असून जोडपरळी येथील विद्यार्थी व पालकांनी प्रहार जनशक्ती पक्ष परभणीचे आभार मानले आहेत.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माघवीताई घोडके, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख ज्ञानोबा काळे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीलाई जुमडे, शहर चिटणीस वैभव संघई, झरी सर्कल प्रमुख शाम भोंग, अनिल पडोळे, सय्यद समीर इत्यादींच्या सह्या होत्या...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या