💥भोसी येथे रस्त्यांची दुरावस्था शाळेत जाण्यासाठी चिमुकल्यांना करावी लागते कसरत...!


💥रस्त्यासंबंधी भोसी ग्रामपंचायत सरपंचांना विचारणा केली असता निधी उपलब्ध नाल्याचे सांगतात सरपंच💥

जिंतूर प्रतिनिधी  /  बी.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील भोसी येथे अनेक वर्षापासून किती वेळेस ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले परंतु ग्रामपंचायत भोसी येथील नागरिकांच्या समस्या मात्र कायम आहेत गावामध्ये एकही रस्ता व्यवस्थित नाही सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत.

दोन वर्षे करोना काळामुळे शाळा बंद असल्याने चिमुकल्यांना शाळाही कुठे आहे ते माहीत नव्हते परंतु यावर्षी कुठेतरी शाळा सुरू झाल्या आहेत परंतु ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे चिमुकल्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताही उपलब्ध नाही.

रस्त्यासंबंधी ग्रामपंचायत भोसी येथील सरपंचांना विचारणा केली असता सरपंच निधी उपलब्ध नाल्याचे सांगतात व निवडणुका आल्या की सर्वच पुढारी गावामध्ये येतात आश्वासने देतात परंतु गावामध्ये कुठलाच विकास केला जात नाही असे पालक सांगतात ही एक चिंताजनक बाब आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या