💥सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत समता पॅनलचा दणदणीत विजय.....!


💥पॅनलचे नेते मुकूंद सावजी कळमकरांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या सर्व उमेदवारांचा प्रचंड मताधिक्याने सर्व जागांवर विजय💥

 जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी.रामपूरकर  

सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत या बँकेचे चेअरमन मुकूंद सावजी कळमकर यांच्या नेतृत्वाखालील समता पॅनलने प्रचंड असे मताधिक्य मिळवून सर्वच्या सर्व जागी विजय मिळवला आहे.

           सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूका दि. 9 जूलै रोजी झाल्या. सोमवारी (दि.11) परभणीत कल्याण मंडपम्च्या सभागृहात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निकाल जाहीर केला. तेव्हा बँकेचे सर्वेसर्वा तथा समता पॅनलचे नेते मुकूंद सावजी कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या सर्व उमेदवारांनी प्रचंड असे मताधिक्य मिळवून सर्वच्या सर्व जागा पटकाविल्या. विरोधी पॅनलच्या उमेदवारांना अक्षरशः अल्प मते मिळाली.

           मुकूंद सावजी कळमकर यांच्या नेतृत्वाखाली समता पॅनलचे प्रशांत सुंदरलाल कळमकर हे 10 हजार 15, घनशाम चुन्नीलालजी गोयल हे 9 हजार 698 व प्रकाशचंद्र बोधुलाल जैन हे 9 हजार 678 एवढे मोठे मताधिक्य मिळवून सर्वसाधारण मतदारसंघ (मुख्यालयापासून 25 किमीवरील शाखांसाठी) विजयी झाले आहेत. या मतदार संघातील विरोधी पॅनलचे पवन आंभोरे यांना केवळ 414 मते मिळाली.

          तर मुकूंदकुमार सुंदरलाल कळमकर हे 9 हजार 468, रावसाहेब रंगनाथराव खंडागळे हे 9 हजार 222, दिलीप यशवंतराव जिंतूरकर हे 9 हजार 232, मनोज भंवरलाल राजोतीया हे 9 हजार 107, श्रीकिशन भास्करराव वट्टमवार हे 9 हजार 556, सुभाष मोहनलाल शर्मा हे 9 हजार 532, धोंडीराम माणिकराव शेप 9 हजार 467, शेख हमीद शेख हनीफ 9 हजार 250 तर श्रीराम छगनलाल सोनी हे 9 हजार 423 एवढे प्रचंड मताधिक्य मिळवून सर्वसाधारण मतदारसंघातून (मुख्यालयापासून 25 किलोमीटर आतील शाखांसाठी) विजयी झाले आहेत. या मतदारसंघात त्यांचे विरोधक कटारे यांना 314, मेडेवार यांना 403, राजेश वट्टमवार यांना 444 एवढीच मते मिळाली.

          तसेच सुभाष माधव सावजी लालपोतू (इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ) हे 9 हजार 983 एवढे मताधिक्य मिळवून विजयी झाले आहेत. येथून त्यांचे प्रतिस्पर्धी विष्णू शहाणे यांना केवळ 393 मते मिळाली. तर अशोक नामदेवराव जोंधळे (अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मतदारसंघ) यांना 10 हजार 56 एवढे मोठी मते मिळाली. येथून त्यांचे प्रतिस्पर्धी कावळे यांना केवळ 320 मते मिळाली.

         दरम्यान, या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर मुकूंद सावजी कळमकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे मतदारांना केलेल्या आवाहनात गेल्या 57 वर्षात सभासदांनी दाखविलेला विश्‍वास व मार्गदर्शन बँकेच्या प्रगतीस कारणीभूत असल्याचे मत व्यक्त केले होते. सावजी बँक ही मराठवाड्यातील अग्रगण्य बँक आहे. बँकेचा विस्तार संपूर्ण महारष्ट्रात झाला आहे. बँकेच्या 24 शाखा संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून बँकेच्या ठेवी 925 कोटी व कर्जव्यवहार 690 कोटी आहे. बँक सातत्याने नफ्यात असून लेखापरीक्षण वर्ग-अ आहे. बँकेने आपल्या कार्यकाळाची 57 वर्ष पूर्ण केली असून बँकेची आर्थिक परिस्थिती अतीशय मजबुत असल्या कारणाने मागील 20 वर्षात बँकेस विविध पुरस्काराने गौरविल्या गेले आहे, असेही नमूद केले होते. महाराष्ट्र शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कार बँकेच्या गौरवात मोलाची भर घालणारा असून विविध पुरस्कार सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या बँकेवरील विश्‍वासाचे प्रतिक आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या