💥समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींना नव्या विधानसभा अध्यक्षांची तंबी...!


💥संभाजीनगर नामकरणावर आ.आझमींनी आक्षेप घेतला. त्यावेळी सभागृहात गोंधळ झाला💥

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली. त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषणे सुरु असताना आमदार अबू आझमी यांनी त्यांच्या भाषणात मध्येच औरंगाबादच्या नामकरणाच्या विषयाला हात घातला आणि संभाजीनगर नामकरणावर आक्षेप घेतला. त्यावेळी सभागृहात गोंधळ झाला. त्याचा वेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने त्यांना झापले. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या आक्रमक आणि शिस्तप्रिय गुणांची चुणूक दाखवून दिली.

आमच्या पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र जाता जाता ठाकरे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलले. राज्यात बेरोजगारांना रोजगार मिळतो, विकासकामे होतात तेव्हा त्यावर आमचा आक्षेप नसतो पण नावे बदलून तुम्ही काय संदेश देऊ पाहता? मुसलमानांची नावे हटवून तुम्ही काय संदेश देऊ पाहता? जुन्या शहरांची नावे बदलून काय उपयोग, नवीन शहर कोणते होत असेल तर काय वाद नाही. अनेक ठिकाणी नवीन शहरे बनवा, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मोठे शहर वसवा, आम्ही मोठ्या मनाने त्याचे स्वागत करू. या देशाला विध्वंसाच्या मार्गावर काही लोक उभे करू पाहत आहेत. संविधान सांगते या देशात राहणाऱ्या सगळ्यांचा सामान हक्क आहे.

*काय म्हणाले अध्यक्ष नार्वेकर ?

यावेळी नव नियुक्त अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विषय सोडून बोलणाऱ्या आझमी यांना झापले. तुम्ही अभिनंदनाच्या ठरावावर बोला. तुमचे इतर मुद्दे मांडण्यासाठी इतर आयुध्ये आहेत. तुम्ही माझ्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलत आहात, असा माझा समज होता, त्यानंतर आझमी मूळ विषयावर बोलू लागले. चुकीचे खपवून घेणार नसल्याचे संकेत देत, सदस्यांना त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी विविध संसदीय आयुधे आहेत, त्यांचा त्यांनी योग्य प्रकारे वापर करणे अपेक्षित आहे, असेही अध्यक्ष नार्वेकर म्हणाले.
औरंगजेब अतिरेकी होता – भास्कर जाधव
आमदार भास्कर जाधव म्हणाले की, मुसलमानांची नावे काढता असा शब्दप्रयोग अबू आझमी यांनी केला. औरंगजेब हा अतिरेकी होता,  अत्याचार केला. म्हणून त्याचे नाव काढले. यात कुठेही समाजात भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न नव्हता....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या