💥जिंतूर-औंढा रोडवरील पुंगळा एमआयडीसीमध्ये मागील एक महिन्यापासून अंधार ?


💥एमआयडीसीतील रोडवरील पथदीवे मागील एक महिण्यापासून बंद💥

जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी. रामपूरकर

जिंतूर (दि.२२ जुलै) - तालुक्यातील जिंतूर-औंढा रोडवरील पुंगळा एमआयडीसीमध्ये मागील एक महिन्यापासून सदरील रोडवरील लाईट बंद आहेत. उप अभियंता परभणी यांना संघटनेच्या वतीने दिनांक  २०जुलै रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे.

 जिंतूर औंढा रोडवरील उद्योजकासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने औद्योगिक वसाहतीची निर्मिती केली आहे .सदरील ठिकाणी अनेक उद्योग चालू असून रोडवरील एलईडी लाईट ९५ पैकी केवळ २०  चालू आहेत. तर पंधरा वर्षांपूर्वी टाकलेले लाईट सर्वच रोडवरील बंद अवस्थेत आहे. या संदर्भात अनेक वेळा लेखी, फोन द्वारे व प्रत्यक्ष भेटून सांगूनही सदरील लाईट दुरुस्तीचे टेंडर न निघल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. तरी या संदर्भातील लवकर लाईट दुरुस्त करावी. तसेच रोडवरील सर्वत्र काटेरी झुडपाने रोड व्यापून गेला आहे. तसेच एमआयडीसीत प्रवेश करतानाच रोडच्या रोडची ही दुरावस्था झाली आहे. तसेच नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा.  अवेळी पुरवठा करीत असल्याने अनेक उद्योजकांमधून त्रिवनाराजी व्यक्त केली जात आहे. सर्व अडचणी सोडवाव्यात अशी मागणी  उपविभागीय अभियंता  परभणी राधेश्याम केदार यांच्याकडे जिंतूर तालुका औद्योगिक वसाहतीच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनावर अध्यक्ष प्रमोद परभणीकर सचिव मंचक देशमुख यांची स्वाक्षरी आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या