💥जिंतूर येथे भरदिवसा घरात घुसुन डाॅ.महीलेवर चाकुहल्ला....!


💥जिंतूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांत हल्लेखोर आरोपी गजाआड💥

जिंतूर  प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर

घरामध्ये कोणी नसताना भर दिवसा दोघाजणांनी घरात घुसून एका डॉक्टर महिलेवर चाकूने वार केल्याची घटना  जिंतूर शहरातील गणेश नगर येथे घडली आहे. डॉ. ज्योती सांगळे असे जखमी झालेले महिला डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या जिंतूर शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. तर अज्ञात हल्लेखोरांना अवघ्या काही तासांत आरोपीला गजाआड केले.

शहरातील गणेश नगर येथे डॉ गणेश सांगळे हे पत्नी डॉ. ज्योती सांगळे आणि मुलीसह राहतात आज सोमवार २५ जुलै रोजी डॉ ज्योती सांगळे या मुलीसह दुपारी घरामध्ये घर काम करत असताना दुपारी अचानक दोघेजण घरामध्ये शिकले. दोघातील एकाने लहान मुलीला चाकू दाखवला या सोबत डॉ ज्योती सांगळे यांना चाकू लावला त्यामुळे डॉ ज्योती सांगळे यांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोरांनी डॉक्टर ज्योती सांगळे यांच्यावर वार करून घरामधून पळ काढला. चाकूने वार केल्याने डॉ. सांगळे यांच्या बोटाला दुखापत झाली आहे.

हल्लेखोरांनी फिर्यादीच्या पती कडुन 20 हजार रुपये घेतलेले परत मागीतल्याचा राग धरुन  आरोपी संतोष सोनवणे यांनी कृत्य केले असल्याचे पोलीसांनी सांगीतले शेजाऱ्यांनी डॉक्टर सांगळे यांच्या घराकडे धाव घेऊन त्यांना उपचारासाठी जिंतूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केली आहे. शेजाऱ्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी आरोपी संतोष यास ताब्यात घेतल्या असून अधिक तपास पोलीस करत आहेत. 

या बाबत जिंतूर पो.स्टे.पोलीस निरीक्षक श्री दीपक दंतुलवार यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.निरक्षक ‌कोकाटे व सहकारी अधिक तपास करत असून या घटने संदर्भात जिंतूर पोलिस स्थानकात कलम ३०७,४५२,३४ भादवी प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या