💥पुर्णेतील गुणवंत विद्यार्थीन श्रद्धा नगरसाळे च्या मदतीला धावले विशाल कदम....!


💥कु.श्रद्धा राजकुमार नगरसाळे हिने नुकतीच 10 वीची परीक्षा दिली त्यात तिला 93.00 % मार्क मिळाले💥

एखाद्या व्यक्तीने कुणाच्या अडचणी बद्दल ऐकलं की जाती धर्माच्या पलीकडं जाऊन मदतीला धावलाच हे जे समीकरण आहे ते फक्त संवेदनशील समाजमन असलेला व्यक्तीच करू शकतो याचा प्रत्यय घडलेल्या कार्यातून आला. 

                आनंदनगर मधील राहणाऱ्या नगरसाळे यांची मुलगी कु.श्रद्धा राजकुमार नगरसाळे हिने नुकतीच 10 वीची परीक्षा दिली त्यात तिला 93.00 % मार्क मिळाले अतिशय तल्लख बुद्धीची आणि हुशार असलेली श्रद्धा हिच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची वडिलांचं छत्र हरवल्यानंतर आपल्या मामाकडे राहून शिक्षण घेत आहे पण आर्थिक हतबलतेने पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिला परिस्थिती समोर हात टेकण्याची वेळ आली घरच्यांना सुद्धा तिच्या शिक्षणाची काळजी लागली होती पण पैश्या पुढं कुणाचं काय चालत . हुशार मुलीला पुढील शिक्षणावाचून पंख छाटल्यासारखं वाटत होतं परंतु याच पंखांना बळ देण्याचं काम शिवसेना जिल्हाप्रमुख विशालभाऊ कदम यांनी केलं आपल्या सहकाऱ्यांच्या वतीने तिला तिच्या पुढील शिक्षणासाठी रोख मदत तर केलीच पण भविष्यातील अडचणीच्या वेळी प्रत्येक वेळी खंबीरपणे पाठीशी असेल अशी ग्वाही दिली त्यावेळी मात्र कुटुंबाला भरून आलं एका भावाने बहिणीला दिलेला मदतीचा हात सदैव सोबत असेल ही प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम दिली..

यावेळी विशाल कदम यांच्या वतीने प्रा गंगाधर खाकरे, रवि कदम,विलास कदम,पत्रकार केदार पाथरकर,चंद्रकांत बरदाले,मुलीचे मामा श्री भाग्यवंत आदींची उपस्तिथी होती तर या मदतीमुळे सर्वच नातेवाईक भारावून गेल्याचे पाहायला मिळाले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या