💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स....!


💥संजय राऊतांनी ५० कोटी घेतल्याचा आरोप केल्यानंतर शंभूराजे देसाईंचं जाहीर आव्हान ; म्हणाले “पुरावा द्या, अन्यथा…💥

  ✍️ मोहन चौकेकर 

* १८ पैकी १२ खासदार व २२ माजी आमदार आमच्यासोबत येणार ; गुलाबराव पाटलांचं मोठं विधान.

* वारकऱ्यांसाठी खूशखबर ; नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.

* ठाण्यात खड्ड्यांमुळं एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली, यावर्षीच्या पावसाळ्यात खड्ड्यांमुळं पहिला बळी गेला 

* पंचगंगा नदीचं पाणी पात्रा बाहेर,पाणी पातळी पोहोचली 30 फुटांच्या वर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

 * रायगड जिल्ह्यात NDRF च्या दोन तुकड्या दाखल,जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी साधला जवानांशी संवाद

* मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा,* पुढचे पाच दिवस सर्वदूर पावसाचा अंदाज 

* पंजाबमध्ये आता ६०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार,पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा

* उद्धव ठाकरे मला परत या म्हणाले होते,” एकनाथ शिंदेचा खुलासा.

* एकनाथ‘शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे ‘फेव्हिकॉल’चा जोड’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार भक्कम असून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा दावा.

* मातोश्रीवर परत जायचा विचार होता,” बंडखोर आमदार संजय राठोड उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांचा ‘मातोश्री’वर परत येण्याचा विचार सुरू होता, संजय राठोड यांचा खुलासा

* धबधबे, हिरवळ, ओढे अन्… स्पेशल व्यक्तीसोबत अमित ठाकरेंचं आंबोलीत ट्रेकिंग; कोकणचा निसर्ग पाहून म्हणाले, “मी इथे…” डोंगर, ओढे, धबधब्यांमधून प्रवास करत अमित ठाकरेंनी केलेल्या या ट्रेकिंगचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

* नुपूर शर्मांचे समर्थन करणाऱ्यांना ठार मारण्याची धमकी ; अकोला, अमरावती, नागपुरात गुन्हयांची नोंद भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेकांनी समाजमाध्यमांवर मजकूर टाकला होता.

* क्षणभर नजर हटली अन्… ६ वर्षांच्या मुलाचा आईसमोरच मृत्यू ; घटनाक्रम CCTV मध्ये कैद ; पिंपरी-चिंचवडमध्ये सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

* बँकेत नोकरीची सुवर्ण संधी! लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु ; बँकिंग कर्मचारी निवड संस्थेच्या (IBPS) माध्यमातून देशभरातील बँकांमध्ये लिपिकांच्या ६०३५ पदांची भरती केली जाणार आहे.

* औंध परिसरात भरदिवसा घरफोडी ; अडीच लाखांचा ऐवज लांबविला औंध परिसरात भरदिवसा सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील दोन लाख ४१ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली.

* महाविद्यालयीन तरुणाचा मोबाइल संच हिसकावणारे चोरटे गजाआड ; मालधक्का चौकातील घटना ; महाविद्यालयीन तरुणाचा महागडा मोबाइल संच हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले.

* एमपीएससीच्या परीक्षा वेळेत होण्यासाठी शासन, आयोगाने नियम ठरवण्याची गरज ; माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांचे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये प्रशासकीय कामकाजाचे नियम आहेत. पण स्पर्धा परीक्षा, वेळापत्रक या संदर्भात काहीच नियम नाहीत.

* हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्याची मागणी का होत आहे? भाग्यलक्ष्मी मंदिराचा काय संबंध जाणुन घ्या ; चारमिनारला लागून असलेले भाग्यलक्ष्मी मंदिर हे या वादाच्या केंद्रस्थानी आहे

* संजय राऊतांनी ५० कोटी घेतल्याचा आरोप केल्यानंतर शंभूराजे देसाईंचं जाहीर आव्हान ; म्हणाले “पुरावा द्या, अन्यथा…” आमच्या नेत्याने एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही असा शब्द दिला आहे, शंभूराजेंनी करुन दिली आठवण

* India vs West Indies ODI Series : एकदिवसीय मालिकेत शिखर धवन करणार नेतृत्व; रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या