💥विनायक भिसे यांनी देखिल बांधले शिवबंधन💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
सुभाष वानखेडे पुन्हां शिवसेनेत मुंबईत उध्दव ठाकरे यांनी बांधले शिवबंधन तसेच छावा दल संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विनायक भिसे यांनी देखिल आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे हिंगोलीत तोडीस तोड नेतृत्व मिळाले असे बोलेजात आहे.
हिंगोली जिल्ह्यात खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेची नव्याने बांधणी केली जात आहे. सुभाष वानखेडे पुन्हा शिवसेनेत आज उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
शिवसेनेला एकीकडे बंडखोरीचे ग्रहण लागलेले असतांना आता यापुर्वी पक्षाला सोडून गेलेल्यांची घरवापसी देखील सुरू झाली आहे. हिंगोली चे माजी खासदार आणि सध्या काॅंग्रेसमध्ये असलेले सुभाष वानखेडे यांनी आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. झालगेलं विसरून ठाकरे यांनी वानखेडे यांना पुन्हा शिवसेनेचा भगवा दिला.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बागंर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी तसेच पाटील, बांगर यांना टक्कर देऊ शकेल अशा नेत्याची शिवसेनेला गरज होती. वानखेडे यांच्या घरवापसीमुळे हे शक्य होऊ शकेल असे बोलले जाते.
परंतु शिवसेनेतून भाजप आणि काॅंग्रेसमध्ये गेलेल्या वानखेडे यांनाच पुन्हा शिवसेनेत घेतल्यामुळे हे स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांना किती रुचेल यावरच पुढील यश अवलंबून असणार आहे. शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी वानखेडे यांच्या घरवापसीचे संकेत नुकतेच दिले होते.
त्यानूसार सुभाष वानखडे आणि विनायक भिसे अशा जिल्ह्यातील दोन नेते व त्यांच्या समर्थकांचा आज मुंबईत पक्ष प्रवेश झाला. वानखेडे यांचे कार्यक्षेत्र हे हिंगोली आणि नांदेड अशा दोन्ही जिल्ह्यात असल्यामुळे पक्ष सोडतांना त्यांच्यासोबत गेलेले दोन्ही जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते देखील लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
हिंगोली जिल्ह्यात खासदार पाटील आणि आमदार बांगर यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेची नव्याने बांधणी केली जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून तसे आदेशच दिले होते. त्यानूसार पक्षाने पुन्हा आपला मोर्चा जुन्या शिवसैनिक व पक्षातून गेलेल्या नेत्यांकडे वळवल्याचे दिसते.
निवडणुकीत केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांत पाटीलांचा पराभव करून वानखेडे हिंगोलीतून खासदार झाले होते. 2014 मध्ये मात्र त्यांचा काॅंग्रेसच्या राजीव सातव यांच्याकडून पराभव झाला होता. 2009 मध्ये वानखेडे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारी मिळवली. पण शिवसेनेच्या हेमंत पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
तत्पुर्वी नांदेड जिल्ह्यातील हदगाव मतदारसंघातून वानखेडे 1995 साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. तीन टर्म त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. 2014 मध्ये वानखेडे यांचा राजीव सातव यांच्याकडून अवघ्या 1600 मतांनी पराभव झाला होता....
0 टिप्पण्या