💥वेळेवर उपचाराअभावी वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु : ओढ्याच्या पूरामुळे झोळी करून चिखल तुडवत गाठले रुग्णालय....!


💥अखेर वृध्दाला वाचवण्याचे पिंपरी खुर्द ग्रामस्थाचे प्रयत्न ठरले अयशस्वी💥  

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे आजारी असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला झोळीत बसून अर्धा किलोमीटर चिखल तुडवत उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार आज सोमवारी दुपारी घडली आहे. संभाजीराव धांडे (७५ )असं मयत व्यक्तीचं नाव आहे.

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे जाण्यासाठी कयाधू नदी लगत असलेल्या नाल्यावर छोटा पूल बांधण्यात आला आहे. मध्यम स्वरूपाच्या पावसातही या पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे आखाडा बाळापूर, पिंपरी खुर्द, चिखली या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे गावकऱ्यांचा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. तर अनेक वेळा आजारी व्यक्तींना गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागते. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

माजी उपसरपंच संभाजी धंाडे यांची चार पाच दिवसा पासून तब्येत बिघडली होती यातच बाळापूर ते कानेगाव दरम्यानच्या ओढ्याच्या फूलावरूण रात्रिपासून  पावसाचे पाणी वाहत होते परिणामी रस्ता बंद झाला होता सोमवारी सकाळी संभाजी धंाडे  याची तब्येत खालावली होती पण रुग्णालयात न्यायचे कसे ओढ्याला तर पूर आला होता मग रुग्णालयात जाण्यासाठी गावकरी गोविंद धांडे, सुरेश धांडे, केशव धांडे, बबन धांडे, संदीप धांडे, रमेश धांडे, अतन शिंदे यांनी लाकडाची झोळी तयार केली त्यामध्ये संभाजीराव धांडे यांना बसून तब्बल अर्धा किलोमीटर चिखल तुडवत इसापूरच्या कालव्यावर आणण्यात आले. त्यानंतर दुचाकी वाहनावर बसून आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात संभाजी यांना दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याना तपासून मृत्यु झाल्याचे सांगितले केवळ रस्ता नसल्यामुळे संभाजीराव धांडे यांना तातडीने आरोग्य सेवा मिळाली नाही व त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.

*दर पावसाळ्यातील ह्या फुलाची गंभीर समस्या :-

पिंपरी खुर्द येथील पुलाची उंची वाढवण्याची मागील दहा वर्षापासूनची मागणी आहे. या संदर्भात वेळोवेळी शासनाकडे व प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. मात्र, त्यावर ठोस निर्णय घेण्यात आला नाही. काही दिवसापूर्वीच उपचाराअभावी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यानंतरची ही तिसरी घटना आहे. आता तरी प्रशासनाने पुलाची उंची वाढवावी. असं पिंपरी खुर्दचे सरपंच गोविंदराव धांडे यांनी सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या