💥कब्रस्थान नाल्यावरील झालेले अतिक्रमण तात्काळ काढून नाला मोकळा करुन द्या...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाकडून जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केली मागणी💥


परभणी (दि.१६ जुलै) - तालुक्यातील पाथरा येथे मुस्लिम वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. गावातील कब्रस्तान मध्ये मागील अनेक दिवसापासून पावसाचे पाणी साचत असल्यामुळे कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलेल्या मृतदेहाची अव्हेलना होत आहे तसेच गावातील एखादा व्यक्ती मृत झाल्यास त्याचा दफनविधी करता येत नाही. ही अत्यंत गंभिर व चिड निर्माण करणारी घटना आहे. 


या कब्रस्तान मधील पाणी ज्या नाल्यातून जाते त्या नाल्यावर पाथरा गावातील गावकर्यांनी अतिक्रमणे केली असल्यामुळे त्या नात्यातून पाणी पुढे जात नाही आणि ते पाणी कब्रस्तान मध्ये पाणी जमा होते. काही दिवसापूर्वी या बाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाची दखल घेत मा.जिल्हाधिकारी मॅडम यांनी तत्काळ कार्यवाही करून सार्वजनिक बांधकाम विभाग व गट विकास अधिकारी परभणी यांना संबंधित नाल्यावरील अतिक्रमण काढून नाला मोकळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी आणून नाला मोकळा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी किंवा जागेची सीमा रेषा ठरवून देण्यासाठी गावचे ग्रामसेवक जागेवर उपस्थित नसल्याने नाला काढण्याचे काम होऊ शकले नाही. सध्या देशभरामध्ये हिंदु - मुस्लिम बाद वाढत चालला असून कब्रस्तान मध्ये साचणाऱ्या पाण्यास कारणीभूत ठरलेल्या नाल्यावर अतिक्रमण झाल्याने गावात जातीय तणाव वाढू शकतो.

पाथरा येथील नागरिकांनी ग्रामसेवक यांना वारंवार विनंत्या करुनही आजपर्यंत अतिक्रमण हटवून नाला साफ करण्याचे काम झालेले झालेले नाही. करिता गावातील नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे या बाबत लेखी तक्रार करून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे त्यानुसार प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाचे पदाधिकारी व  पाथरा गावच्या नागरिकांच्या शिष्ट मंडळासह परभणी पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. कांबळे यांची भेट घेऊन गावातील नाल्यावरील अतिक्रमण तत्काळ काढून कब्रस्तान मध्ये साचनारे पाणी संबंधित नाल्या मार्फत काढून द्यावे तसेच वरिष्ठांच्या आदेशा नंतर ही कब्रस्तान सारख्या संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण काढणे व नाला मोकळा करून देण्याच्या कामात जाणीवूर्वक दुर्लक्ष करून फक्त कागदी घोडे नाचवणाऱ्या पाथरा येथील ग्राम सेवकाची चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख ज्ञानोबा काळे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख सय्यद मुस्तफा, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, सय्यद मजहर, शेख अमजद, सय्यद महमूद, सय्यद अरशद, सय्यद रफिक, सय्यद इब्राहिम, सय्यद हुसेन, सय्यद समीर, शेख रहिम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या