💥भारताच्या राष्ट्रपती द्रोपती मुर्मु याच्या बद्दल अपशब्द वापरल्या बद्दल जिंतूर येथे निषेध....!


💥आदिवासी युवा कल्याण संघाच्या वतीने घटनेच्या निषेधार्थ तहसीलदारांना देण्यात आले निवेदन💥


जिंतूर प्रतिनिधी /  बी.डी.रामपूरकर

          भारताचे उच्चपद असणारे राष्ट्रपती यांचा अपमान केल्या बद्दल जिंतूर मध्ये आदिवासी युवा कल्याण संघ यांच्या वतीने जिंतूर येथील तहसील कार्यालयात तहीलदारा मार्फत  निवेदन देण्यात आले. राष्ट्रपती यांना राष्ट्रपत्नी म्हणल्या बद्दल काॅग्रेस नेते रंजन चौधरी व काॅग्रेस पक्षाध्यक्ष सोनीया गांधी  यांनी जनतेची व संसदेची माफी मागावी यासाठी जिंतूर मधून आदिवासी बांधव आदिवासी युवा संघ जिल्हाध्यक्ष माधवराव घोगरे, नेताजी चिबदे, विश्वनाथ अंभोरे, भानुदास वाकळे, रामा चिबडे, शिवाजी सोनुळे, एकनाथ वाकळे, रमेश मोहिते, कांतीलाल साबळे, सुरेश मुळे आदी जणांनी निवेन देताना उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या