💥जिंतुर तालुक्यातील २२ गणांची आरक्षण सोडत आज तहसिल कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली....!


💥यावेळी उपजिल्हाधिकारी दत्ता शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती : आरक्षणांच्या चिठ्ठ्या लहान बालकांच्या हस्ते काढण्यात आल्या💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर

जिंतुर तालुक्यातील २२ गणांची आरक्षण सोडत आज तहसिल कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली. यावेळी लहान चिमुकलीच्या हस्ते चिठ्या काढण्यात आल्या. उपजिल्हाधिकारी दत्ता शेवाळे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार परेश चौधरी यांच्या उपस्थितीत चिमुकली शिवानी रामप्रसाद कंठाळे हिच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले.

 २२ पंचायत समिती गणाची सोडत अशी, वझर बु.-सर्वसाधारण, सावंगी भांबळे-सर्वसाधारण महिला, वाघी धानोरा-सर्वसाधारण, कु-हाडी-अनूसूचित जाती महिला, सावंगी म्हाळसा- नागरिकांचा मागास प्रवर्ग, अंबरवाडी-अनूसूचित जाती महिला, इटोली-सर्वसाधारण महिला, आडगाव बाजार-अनूसूचित जमाती, भोगाव-अनूसूचित जाती, लिंबाळा-सर्वसाधारण, पुंगळा-नागरीकांचा मागास प्रवर्ग, पांगरी-सर्वसाधारण, वरुड-सर्वसाधारण महिला, भोसी-सर्वसाधारण, चारठाणा-सर्वसाधारण महिला, जांब बु.-सर्वसाधारण, बोरी-सर्वसाधारण महिला, निवळी बु.-सर्वसाधारण महिला, वस्सा-नागरीकांचा मागास प्रवर्ग, दुधगांव-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, कोक-सर्वसाधारण व कौसडी-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.

* जिंतूर- नगर परिषद आरक्षण सोडत जाहीर :-

जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषदेचा आरक्षण सोडत कार्यक्रम आज दि(२८)रोजी नगर परिषदेच्या मौलाना आझाद सभागृहात  मान. जिल्हाधिकारी परभणी यांनी नेमून दिलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या अधिपत्याखाली कामकाज पार पडले यावेळी जिंतूर शहरातील विविध पक्षांचे स्थानिक पुढारी आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयाला शिंदे सरकारने ब्रेक दिल्याने हा कार्यक्रम पुनश्च जाहीर करण्यात आला आहे. 

* नगर परीषद सोडत :-

जिंतूर नगर परिषदेच्या एकूण 12 प्रभागासाठी एकूण 25 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत. यात प्रभाग क्र.09 मध्ये एकूण 3 उमेदवार असून ईतर प्रभागात अपक्ष आणि राजकीय पक्षांचे प्रत्येकी 2 उमेदवार असणार आहेत. आरक्षण सोडत पुढील प्रमाणे घोषित करण्यात आली.

प्रभाग क्र-01

सर्वसाधारण महिला-01 

सर्वसाधारण-01, प्रभाग क्र-02

सर्वसाधारण महिला-01

नागरिकांचा मागास प्रवर्ग-01, प्रभाग क्र-03 सर्वसाधारण-01

सर्वसाधारण महिला-01,  प्रभाग क्र-04 नागरिकांचा मागास प्रवर्ग-01

सर्वसाधारण महिला-01, प्रभाग क्र- 05 सर्वसाधारण महिला-01

सर्वसाधारण-01, प्रभाग क्र-06 

सर्वसाधारण महिला-01

सर्वसाधारण-01, प्रभाग क्र-07

सर्वसाधारण महिला-01

सर्वसाधारण-01, प्रभाग क्र-08

सर्वसाधारण महिला-01

सर्वसाधारण-01, प्रभाग क्र-09

अनुसूचित जाती-01, 

नागरिकांचा मागास प्रवर्ग-01, 

सर्वसाधारण-01, प्रभाग क्र-10

सर्वसाधारण महिला-01

सर्वसाधारण-01, प्रभाग क्र-11 

नागरिकांचा मागास प्रवर्ग-01

सर्वसाधारण-01, प्रभाग क्र-12

अनुसूचित जाती महिला-01

सर्वसाधारण-01 असे आरक्षण देण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या