💥सेनगाव तालुक्यातील सवना येथील गावकऱ्यांच्या वतीने ब्राह्मणवाडा पाटीजवळ रास्तारोको आंदोलन....!


💥ब्राम्हणवाडा पाटीवर सेनगाव वकील संघाचे मा.अध्यक्ष ॲड.प्रवीण नायक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला रास्ता रोको💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

सेनगाव तालुक्यातील सवना यथे गुरुवारी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांची  रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे या मागणीसाठी गोरेगाव-कनेरगाव नाका या रस्त्यावर सकाळी 11वाजता गावकरी व पालक यांच्या वतीने ब्राम्हणवाडा पाटीवर ऍड प्रवीण नायक माजी अध्यक्ष वकील संघ सेनगाव,यांच्या नेतृत्वाखाली रास्ता करण्यात आला यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


सवना येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत इयत्ता 10 ला गणित व विद्यान या प्रमुख विषयाला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन या संदर्भात शिक्षण विभागाला वारंवार लेखी पत्र व्यवहार व पाठपुरावा करून सुद्धा या शिक्षक मिळत नसल्यामुळे कुंभकर्ण झोपेत असलेल्या शिक्षण विभागाला जागे करण्यासाठी गुरुवारी ता,28 ला रास्ता रोको करणे हे पाऊल उचलावे  लागले यावेळी पंचायत समिती सेनगाव चे गटविकास अधिकारी श्री गव्हाणे यानी या ठिकाणी भेट दिली यावेळी त्यानी शिक्षण अधिकारी जि, प,हिंगोली यांच्या सोबत दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सोमवार पर्यंत एक शिक्षकाची रिक्त जागा भरून देतो असे यावेळी सांगितले व तसेच श्री गव्हाणे यांनी लेखी स्वरूपात पत्र दिले त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले त्यानंतर हा रस्ता पुरवत करण्यात आला यावेळी ऍड प्रवीण नायक माजी अध्यक्ष वकील संघ सेनगाव,विजय वानखेडे,संदीप वानखेडे,राजकुमार नायक,भिकाजी भालेराव,वसंतराव नायक, शिवाजी नायक,बाळासाहेब नायक,पी आर नायक,गजानन नायक,प्रमोद नायक,अरविंद नायक,बी,आर,नायक,सतीश नायक, श्याम रणबावळे, अमोल भालेराव, सुरेश क्षीरसागर,रामेश्र्वर भालेराव,यांच्यासह गावकरी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त होता...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या