💥शाळेच्या परिसरात गावाचा नकाशा केला तयार💥
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर
जिंतुर--तालुक्यातील गणपुर येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत जिवन जोत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित राजीव गांधी कृषी महाविद्यालय येथील कृषी कन्यानी कृषी विस्तारा अंतर्गत सहभागी ग्रामीण मूल्यांकन व ग्राम सर्वेक्षण या कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमा दरम्यान त्यानी गावातील लोकांकडून गावा बद्दलची माहीती गोळा केली आणि गणपुर गावचा नकाशा शाळेच्या परिसरात तयार केला. त्यामध्ये त्यांनी गावाचे ग्रामपंचायत ऑफिस, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, गावातील मंदिर व तिथले घर त्या नकाशा मध्ये दर्शविले
विद्यार्थिनीन सोबत सरपंच अनिल लांडगे यांची उपस्थिती होती व त्यांना कार्यक्रम अधिकारी डॉ. डि.बी पवार,प्राध्यापक वट्टमवार, प्राध्यापक कौसडीकर यांचे मार्गदर्शन लाभले . सर्व कृषी कन्यानी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले....
0 टिप्पण्या