💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स /अपडेट्स.....!


💥पुण्याच्या बोगस शिक्षक भरती प्रकरणी ईडीची एन्ट्री झाली ?💥

✍️ मोहन चौकेकर 

*महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यास त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही,* *शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य.

* आम्हाला 166 आमदारांचा पाठिंबा आहे.* *पूर्णपणे मजबूत सरकार आहे, संजय राऊतांच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उत्तर.

* ज्या शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.* *त्यांना संपूर्ण कर्जमाफी शासनाने जाहीर करावी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी*

* ओबीसी आरक्षणाला मंजुरी मिळण्यापूर्वी जाहीर झालेल्या 365* *निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

* पुण्याच्या बोगस शिक्षक भरती प्रकरणी ईडीची एन्ट्री झाली ? तक्रारदार किसन भुजबळ यांना ईडीने जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते.*

* “माझ्याशी बोलू नका,” लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणींमध्ये जोरदार खडाजंगी, सुप्रिया सुळेंना करावी लागली मध्यस्थी.

*लोकसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी आमने-सामने आल्याने मोठा वाद*

* बंडखोर खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांचा शिवसेनेत प्रवेश : खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनी आपल्या हातावर शिवबंधन बांधलं आहे.

*“राज्यात सध्या दोन जणांचं अपंग मंत्रिमंडळ,राज्यपाल शांत का ?” नाना पटोलेंची विचारणा.

*राज्यात मंत्रिमंडळात १२ किंवा २४ मंत्री असल्याच हवे, असे संविधानात लिहिले आहे. या सर्व प्रकारावर महामहीम राज्यपाल शांत का आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.*

* शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना मिळाली  मोठी जबाबदारी, उद्धव ठाकरेंनी सर्वांसमोर केली घोषणा.

* शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत.

* ५० कोटीहून अधिकची रोकड,३ सोन्याच्या विटा,अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटमध्ये आणखी काय सापडलं ? पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या फ्लॅटवर बुधवारी ईडीच्या पथकाने छापेमारी केली आहे.

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांना घरातूनच धक्का ; बंधू संजय जाधव शिवसेनेतच प्रतापराव जाधव यांना बंडखोरीत घरातूनच साथ न मिळाल्याने राजकीय वर्तुळात हा मुद्दा चर्चेचा ठरत आहे.

* फक्त दोन आठवड्यात पाच मृत्यू ; तामिळनाडूत गेल्या दोन आठवड्यात पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून राज्यात खळबळ उडाली आहे

* १२७८ डास उत्पत्ती स्थळांना नोटीसा डेंग्यू,मलेरिया यासारख्या कीटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे.

* कांदिवलीत महिलेचा संशयास्पद मृत्यू ; डोक्यावर व गळ्यावर धारदार शस्त्राने वार : दीड वर्षांपासून कामानिमित्त मुंबईत एकटीच राहत होती.

* शहरातील २८ टक्के नागरिक झोपडपट्टीत वास्तव्य : शहरातील २८ लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये रहात असून एकूण अधिकृत झोपडपट्ट्यांची संख्या ३९० एवढी आहे

* नेरुळ-उरण उपनगरीय मार्गिका २०२३ पासून प्रवाशांच्या सेवेत दुसरा टप्प्यातील भूसंपादन रखडल्याने विलंब

* कुलूप दुरुस्तीच्या बहाण्याने सहा लाखांचा गंडा कुलूप दुरूस्तीचे काम शोधत फिरणाऱ्या दोघांना  कपाटाचे कुलूप दुरूस्त करण्यास सांगितले होते.

* ४०० अध्यादेश काढता, पण एक समिती स्थापन करण्यासाठी वेळ नाही ? – उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवरून सुनावले आहे.

* सरकारी नोकरीसाठी धडपड : आठ वर्षात २२ कोटी अर्ज, केवळ ७ लाख २२ हजार जणांना मिळाली नोकरी; केंद्र  सरकारची लोकसभेत माहिती १४ जूनला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या १८ महिन्यांमध्ये १० लाखांना ‘मिशन मोड’ मध्ये रोजगार दिला जाईल अशी घोषणा केली.

* ठरलं ‘या’ वर्षी क्रिकेटच्या पंढरीवर रंगणार जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे अंतिम सामने : आयसीसीने २०२३ आणि २०२५ मधील स्पर्धेच्या अंतिम सामन्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या