💥या रस्त्याचे काम होत नसल्याने नागरीकांचा जीव धोक्यात आला आहे💥
परळी वैजनाथ (दि.१९ जुलै) :- परळी शहरातून जाणाऱ्या परळी ते मलकापूर रस्ता जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे व उखडला असुन डोंगरावरील माती रस्त्यावर आल्याने चिखलमय झाला. या मार्गावरुन प्रवास करणे जीवघेणे बनले आहे.अनेक वेळा मागणी करुनही या रस्त्याचे काम होत नसल्याने नागरीकांचा जीव धोक्यात आला आहे. तरी या रस्त्याचे काम तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विजय गित्ते यांनी केले आहे.
परळी शहरातून मलकापुरमार्गे धर्मापुरीकडे जाणार्या पर्यायी रस्त्यावर मलकापूर, मरळवाडी, मांडवा या गावांची वाहतुक होते.या भागात दुग्ध व्यवसाय आहे.परळी शहरात काम करणारांची संख्या मोठी असल्याने दररोज दुचाकीवरुन ये- जा करावी लागते.या रस्त्यावर शहरातील हनुमान नगर भागात चिखल झाल्याने कसरत करुन प्रवास करावा लागत आहे. जे.के. मंगल कार्यालयाजवळ डोंगरावरील माती पावसाने रस्त्यावर आलेली आहे.तसेच घणशी नदीवरील पुलही मोडकळीस आलेला असल्याने हा रस्ता प्रवास करण्यासाठी जीवघेणा बनला आहे. रस्त्यावर नुसते खड्ड्यात खड्डे झाले आहेत. त्यात पाणी आणि चिखल झाल्याने हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. तसेच रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूने मोठमोठे खड्डे झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी मलकापूर, मरळवाडी, मांडवा या गावातील ग्रामस्थांनीसह मलकापूर ग्रामपंचायत सदस्य विजय गित्ते यांनी केली आहे.....
0 टिप्पण्या